रिवर्स वॉशिंग म्हणजे काय माहीत आहे का?; उन्हाळ्यात केसांसाठी ठरतं फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 04:36 PM2019-06-01T16:36:56+5:302019-06-01T16:37:48+5:30
उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी वापरण्यात येणारे उपाय हे हिवाळ्यापेक्षा थोडे वेगळे असतात. उन्हाळ्यामध्ये घाम, धूळ-माती यांमुळे केसांचे आरोग्य बिघडते.
उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी वापरण्यात येणारे उपाय हे हिवाळ्यापेक्षा थोडे वेगळे असतात. उन्हाळ्यामध्ये घाम, धूळ-माती यांमुळे केसांचे आरोग्य बिघडते. अशातच केसांची काळजी घेण्यासाठी काही खास गोष्टी करणं गरजेचं असतं. त्यामुळे उन्हाळ्यात रिवर्स वॉशिंग किंवा प्री-कंडिशनिंग ट्राय करून पाहा. अनेकदा आपण केसांची तेलाने मालिश करून त्यानंतर शॅम्पू करण्याची गोष्ट मनावर घेत नाही. पण आता हा ट्रेन्ड पुन्हा आला आहे. जाणून घ्या प्री-कंडिशनिंग किंवा रिवर्स वॉशिंगबाबत सर्व काही...
काय आहे प्री-कंडिशनिंग?
नावावरूनच समजतं आहे की, प्री-कंडिशनिंगचा अर्थ आहे शॅम्पू करण्याआधी कंडिशनिंग करणं फायदेशीर आहे. कारण हे केसांना सॉफ्ट, शायनी बनवतात. तसेच यामुळे केस कोरडे दिसत नाहीत.
कसं कराल प्री-कंडिशनिंग?
प्री-कंडिशनिंग करण्यासाठी तुम्ही कोणतंही तेल किंवा कंडिशनरचा वापर करू शकता. आंघोळ करण्याआधी केसांवर व्यवस्थित तेल किंवा कंडिशनर लावा. तुम्ही केसांना थोडसं ओलं करू शकता. हे केसांना 15 मिनिटांपर्यंत तसचं ठेवा. त्यानंतर शॅम्पूने केस धुवून घ्या. लक्षात ठेवा तेल किंवा कंडिशनर स्काल्पवर लावू नका.
महागड्या कंडिशनरऐवजी याचा वापर करा
गरजेचं नाही की, महागड्या कंडिशनरचाच वापर करण्यात यावा. तुम्ही नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा दहीसुद्धा लावू शकता. हे रात्रभर लावण्याऐवजी शॅम्पू करण्याच्या एक तास अगोदर लावा.
काय होतो फायदा?
हेअर एक्सपर्ट्सच्या मते, आपला स्काल्प केसांना प्रोटेक्ट करण्यासाठी सीबम रिलीज करतात. थेट शॅम्पू केल्याने सीबम निघून जातं. ज्यामुळे स्काल्प डिहायड्रेट होतात. त्यामुळे स्काल्पची पीएच लेव्हल योग्य ठेवण्यासाठी सर्वात आधी कंडिशनर करणं फायदेशीर ठरतं.
हेअर कलर ट्रिक
जर तुम्ही हेअर कलर करण्याचा विचार करत असाल तर हेअर कलर केल्यानंतर प्री-कंडिशनिंग करा. कारण कलरमध्ये असलेले केमिकल्स तुमच्या केसांना ड्राय करतात.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.