खोबऱ्याचं तेल आणि कोरफडीचं मिश्रण वाढवतं सौंदर्य; जाणून घ्या फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 07:30 PM2019-05-17T19:30:13+5:302019-05-17T19:32:13+5:30
उन्हाळा प्रचंड वाढला असून सूर्य आपल्या डोक्यावर तळपत आहे. वातवरणातील हैराण करणाऱ्या उकाड्यामुळे घरातून बाहेर पडणं अशक्य झालं आहे.
उन्हाळा प्रचंड वाढला असून सूर्य आपल्या डोक्यावर तळपत आहे. वातवरणातील हैराण करणाऱ्या उकाड्यामुळे घरातून बाहेर पडणं अशक्य झालं आहे. उष्णता, धूळ, माती आणि प्रदूषणामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांच्याही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तेलकट, खाज येणारे स्काल्प, निर्जीव आणि निस्तेज केस या उन्हाळ्यात भेडसावाऱ्या समस्यांपैकी काही समस्या आहेत. पण केसांची योग्य काळजी घेतल्यानंतर या सर्व सस्यांपासून सुटका करून घेणं शक्य होतं.
उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खोबरेल तेल आणि कोरफड उन्हाळ्यात आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. कोरफडीमधील अॅन्टीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे केस आणि त्वचेसाठी फायदा होतो. याव्यतिरिक्त खोबऱ्याचं तेल कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे कोरफड आणि खोबऱ्याचं तेल एकत्र करून केसांना लावणं फायदेशीर ठरतं.
1. केसांना चमकदार आणि मुलायम करण्यासाठी
कोरफडीमध्ये प्रथिनं, जीवनसत्त्व आणि खनिज तत्व मुबलक प्रमाणात असतात. जी आपल्या केसांच्या फोलिकल्सना पोषण देण्याचे काम करते. यामुळे केसांचं टेक्चर सुधारण्यास मदत होते.
2. पाण्यातील क्षारांपासून बचाव करण्यासाठी
उन्हाळ्यामध्ये पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढते. पाण्यातील क्षार केसांचं आरोग्य बिघडवतात. त्यामुळे केस कोरडे होतात. याशिवाय डोक्याच्या त्वचेलाही नुकसान पोहोचतं. केस धुण्याआधी कोरफडीचं जेल खोबऱ्याच्या तेलासोबत एकत्र करून लावल्याने केसांच्या सर्व समस्या दूर होतात. तसेच केसांना मॉयश्चराइज्ड आणि हायड्रेट ठेवणं आणि डोक्याच्या त्वचेची पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यासाठीही मदत करते.
3. हेअर लॉक्सना दुरूस्त करण्यासाठी
खोबऱ्याचं तेल आणि कोरफड एकत्र करून लावल्याने केसांच्या मुळांनाही फायदा होतो. कोरफडीमध्ये असलेले एन्जाइम्स स्काल्पवरील मृत त्वचा दूर करण्यासाठी मदत करतो. हे मिश्रण केसांचा निस्तेजपणा दूर करतं आणि केसांना मुलायम करण्यासाठी मदत करतं.
4. केसांची वाढ होते
कोरफड आणि खोबऱ्याच्या तेलाचे मिश्रण केसांच्या वाढिसाठी नैसर्गिक उपाय म्हणून ओळखलं जातं. यामुळे केस फक्त लांबच होत नाहीत तर मुलायम आणि मजबुत होतात.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.