चमकदार त्वचेसाठी वापरा बेसनाचे 'हे' 2 फेसपॅक; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 06:07 PM2019-06-12T18:07:45+5:302019-06-12T18:14:14+5:30
जेव्हा त्वचेसाठी फायदेशीर ठरणाऱ्या घरगुती उपायांबाबत सांगितलं जातं. तेव्हा सर्वात आधी बेसनचा पर्याय सुचवण्यात येतो. बेसनामध्ये अनेक अशी तत्व असतात, जी त्वचेवरील घाण दूर करण्यासाठी मदत करतात.
जेव्हा त्वचेसाठी फायदेशीर ठरणाऱ्या घरगुती उपायांबाबत सांगितलं जातं. तेव्हा सर्वात आधी बेसनचा पर्याय सुचवण्यात येतो. बेसनामध्ये अनेक अशी तत्व असतात, जी त्वचेवरील घाण दूर करण्यासाठी मदत करतात. यामध्ये असलेलं झिंक पिंपल्स आणि अॅक्ने दूर करतात. स्किन टॅन झाली असेल तर त्यासाठीही बेसन फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त हे त्वचेचा रंग उजळवण्यासोबतच त्वचा चमकदार करण्यासाठीही मदत करतं.
आज आम्ही तुम्हाला बेसनापासून तयार करण्यात येणाऱ्या अशा फेसपॅक्सबाबत सांगणार आहोत, जे त्वचा चमकदार करण्यासोबतच रंग उजळवण्यासाठीही मदत करतात.
बेसन, दूध आणि लिंबाचा पॅक
- यासाठी 3 ते 4 चमचे बेसन घ्या आणि त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस आणि 2-3 चमचे कच्चं दूध एकत्र करा.
- आता सर्वात आधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि क्लिंजरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.
- आता तयार फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा. अर्धा तास असचं राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत फेसपॅक काढून टाका.
- त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका.
- या फेसपॅकमध्ये कच्च्या दूधाऐवजी दूधाची मलईही वापरू शकता. बेसन ड्राय स्किनसाठी उत्तम पर्याय ठरतो. त्यासाठी तुम्ही बेसनमध्ये केळ एकत्र करून चेहऱ्यावर लावू शकता.
बेसन आणि हळदीचा फेसपॅक
त्वचेचा रंग उजळवण्यासाठी बेसन आणि हळदीचा फेसपॅकही तयार करून लावू शकता. हळद आणि बेसनासोबत थोडसं चंदन आणि 3 ते 4 थेंब गुलाब पाणी एकत्र करून मिक्स करू शकता. आता हे चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि त्यानंतर एक तासाने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.