चेहऱ्यावरील वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठी 'हे' अॅन्टी-एजिंग फुड्स करतील मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 11:49 AM2019-11-09T11:49:23+5:302019-11-09T11:50:03+5:30
वाढत्या वयानुसार त्वचेची काळजी घेण्यासाठी विशेष उपाय करणं आवश्यक असतं. जर चेहऱ्याच्या त्वचेवर सुरकुत्या, डाग उद्भवत असतील तर याला स्किन एजिंग म्हटलं जातं.
वाढत्या वयानुसार त्वचेची काळजी घेण्यासाठी विशेष उपाय करणं आवश्यक असतं. जर चेहऱ्याच्या त्वचेवर सुरकुत्या, डाग उद्भवत असतील तर याला स्किन एजिंग म्हटलं जातं. अनेक लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी महागड्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण त्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो कमी होतो. जर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला डाग दिसू लागले तर तुम्हाला हेल्गी डाएटसोबतच स्किन केअर डाएट घेणंही अत्यंत आवश्यक आहे. कारण हेल्दी त्वचेसाठी अॅन्टी-एजिंग फूडची गरज असते. महिलांनी विशेष करून डाएटमध्ये अॅन्टी-एजिंग पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. आम्ही आज अशाच काही पदार्थांबाबत सांगणार आहोत. जे महिलांच्या त्वचेचं आरोग्य राखण्यासोबतच त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठीही मदत करतात.
अवोकाडो
त्वचेसाठी अवोकाडो सुपरफूड समजलं जातं. अवोकाडोमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडसोबत व्हिटॅमिन बी12 सहित इतरही व्हिटॅमिन्स आढळून येतात. या व्हिटॅमिन्समुळे त्वचेचा ग्लो वाढविण्यासाठी मदत होते. त्यामुळे हेल्दी त्वचेसाठी डाएटमध्ये कमीत कमी एक अवोकाडोचा समावेश करा.
त्वचा हेल्दी राखण्यासाठी व्हिटॅमिन्स आणि खनिज तत्वांचा समावेश असणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं आवश्यक आहे. अवोकाडोमध्ये व्हिटॅमिन्स आणि खनिज तत्व मुबलक प्रमाणात असतात. हे सुपरफूड्स त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी असिड असतं. जे त्वचेच्या पेशींना पोषण देतं.
मेथीचं सेवन करा
थंडीच्या वातावरणात त्वचेची काळजी घेण्याची गरज असते. थंडीत त्वचेची काळजी घेण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा पदार्थ म्हणजे, मेथीचे दाणे. मेथीची भाजी पोषण देण्यासोबतच त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. चेहऱ्याच्या सुरकुत्या जर ठिक करायच्या असतील तर आपल्या डाएटमध्ये मेथीचा समावेश नक्की करा.
दही
संतुलित आहारामध्ये दह्याचं सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन आणि हेल्दी बॅक्टेरिया तयार करण्याती क्षमता असते. पचनक्रिया सुरळीत करण्यासोबतच त्वचेची काळजी घेण्यासाठी दही अत्यंत फायदेशीर ठरतं. ग्लोइंग स्किनसाठीही आपल्या डेली डाएटमध्ये कमीत कमी एक वाटी दह्याचं सेवन करा.
बदाम
चमकदार त्वचेसाठी ओमेगा 3 फॅटा अॅसिड अत्यंत आवश्यक असतं. बदामामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात आढळून येतं. बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळून येतं. जे त्वचेसाठी अत्यंत आवश्यक ठरतं.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)