​पुरुषांच्या लांब केसांसाठी बेस्ट हेअरस्टाइल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2016 05:19 PM2016-12-07T17:19:32+5:302016-12-07T17:19:32+5:30

व्यक्तिमत्त्वाची छाप पाडताना आकर्षक हेअरस्टाइलची भूमिका महत्त्वाची असते. त्यातच महिलांच्या तुलनेने पुरुषांची हेअरस्टाईल कठीण असते. विशेष म्हणजे बहुतेक पुरुषांच्या केसांची लांबी कमीच असते, त्यामुळे त्यांना सेट करण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात.

Best Hairstyles for Men's Long Hair! | ​पुरुषांच्या लांब केसांसाठी बेस्ट हेअरस्टाइल!

​पुरुषांच्या लांब केसांसाठी बेस्ट हेअरस्टाइल!

Next
ong>-Ravindra More

व्यक्तिमत्त्वाची छाप पाडताना आकर्षक हेअरस्टाइलची भूमिका महत्त्वाची असते. त्यातच महिलांच्या तुलनेने पुरुषांची हेअरस्टाईल कठीण असते. विशेष म्हणजे बहुतेक पुरुषांच्या केसांची लांबी कमीच असते, त्यामुळे त्यांना सेट करण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. सेलिब्रिटींचे अनुकरण करुन बहुतांश पुरुष लांब केस ठेवण्याची फॅशन करताना दिसत आहेत. मात्र प्रत्येकालाच लांब केस ठेवणे आवडत नाही. कारण लांब केस असूनही योग्य हेअरस्टाइलच्या बाबतीत कनफ्यूजन असते. केसांना सेट करतेवेळी हे लक्षात घ्यायला हवे की, संबंधित हेअरस्टाइल आपल्या चेहऱ्याला सूट करीत आहे की नाही. आजच्या सदरात आपण पुरुषांच्या लांब केसांसाठी बेस्ट हेअरस्टाइल कशी करावी, याबाबत जाणून घेऊया...

कोणत्या गोष्टींची घ्याल काळजी

लांब केस आपल्या व्यक्तिमत्त्वाला सूट करतील की नाही, याचा विचार करुनच लांब केस ठेवण्याचा निश्चय करा. यासाठी आपण एखाद्या हेअर एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकतो. 
जर आपण एखाद्या विशेष इव्हेंटसाठी आपला लूक बदलू इच्छिता, तर त्यावेळी हेअर कटिंग करण्याची गरज नाही. आपण आपल्या केसांची सेटिंगदेखील करु शकता. 
जर आपणास कोट-पॅँट परिधान करणे जास्त आवडत असेल तर आपण आपल्या केसांना स्ट्रेट ठेवावे. यासाठी आपण केसांना जेल किंवा सीरम लावून केसांना सेट करु शकता.
जर आपण हिवाळ्यात विशेषत: जीन्ससोबत ब्लेझर परिधान करीत असाल तर आपणास स्मोकी लूक खूपच सूट करेल. जीन्स आणि ब्लेजरसोबत स्मोकी हेअरस्टाइल खूपच आकर्षक वाटते. 
आपण कॉलेजला जात असाल आणि कॅज्युअल ड्रेस जास्त परिधान करीत असाल, तर आपण पोनीदेखील बनवू शकता. पुरुषांच्या लांब केसांमध्ये पोनी हेअरस्टाइल सहज बनविली जाऊ शकते. 
केसांना नवा लूक देण्यासाठी आपण कलरदेखील करु शकता. जर आपण थोड्याच दिवसांसाठी कलर ठेवू इच्छिता, तर असा कलर करा की जो लवकर लाइट होईल. 
जर आपण इंटरव्यूव्हसाठी कॅज्युअल ड्रेसमध्ये जात असाल तर सिंपल लूक आत्मसात करु शकता. इंटरव्यूव्हमध्ये सिंपल लूक आपणास खूप सूट करेल आणि आपल्या चेहऱ्यावर गांभीर्यदेखील दिसेल. 
सध्या फंकी लूक म्हणजेच अन इव्हन कटलादेखील तरुणाईची खूप पसंती मिळत आहे. जर आपण एखाद्या पार्टीमध्ये जात असाल तर फंकी लूकमध्ये जाऊ शकता. या लूकमध्ये आपणास केस जास्त सावरण्याची गरज नसते. 
जर आपले केस जास्तच लांब असतील तर त्यांना आपण मोकळेदेखील ठेऊ शकता. लांब केसांना मोकळे ठेवल्याने आपले व्यक्तिमत्त्व नक्कीच खुलून दिसेल. 
पुरुषांच्या लांब केसांसाठी वेवी हेअरस्टाइलदेखील आकर्षक दिसते. ही स्टाइल आपणास सर्वात वेगळी आणि कूल लूक देईल. बरेच हॉलिवूड स्टार आपल्या केसांची वेवी हेअरस्टाइलच ठेवतात. 
आपल्यासाठी कोणतीही हेअरस्टाइल सिलेक्ट करताना आपल्या चेहऱ्याचा आकार कसा आहे, याची काळजी घ्यावी आणि त्या आकाराला सूट करेल अशीच हेअरस्टाइल निवडावी, जेणेकरुन आपण इतरांपेक्षा हटके दिसाल.

Web Title: Best Hairstyles for Men's Long Hair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.