केसांच्या गळण्यामुळे हैराण आहात का?; 'हे' 3 हेयर मास्क ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 12:21 PM2019-03-31T12:21:31+5:302019-03-31T12:24:03+5:30
केस गळणं ही आपल्यापैकी अनेकांना सतावणारी समस्या आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यामुळे अनेक महिला आणि पुरूष त्रस्त आहेत.
केस गळणं ही आपल्यापैकी अनेकांना सतावणारी समस्या आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यामुळे अनेक महिला आणि पुरूष त्रस्त आहेत. हेअर फॉल रोखण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. अशातच बाजारात मिळणाऱ्या महागड्या हेयर ऑइल्सपासून, शॅम्पू, कंडिशनर्स आणि हेयप पॅकचा वापर करण्यात येतो. परंतु या सर्व उपायांचा काहीही फायदा होत नाही. सतत केस गळत असल्यामुळे अनेक लोक सलून आणि पार्लरमध्ये जाऊन अनेक महागड्या हेयर ट्रिटमेंट घेत आहेत. अनेकांवर तर हेयर ट्रान्सप्लांट करण्याची वेळ आली आहे. आज आम्ही तुम्हाला काही हेअर मास्कबाबत सांगणार आहोत, जे केस गळण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
अंड्याचा हेयर मास्क
अंड्यामध्ये प्रोटीनसोबतच इतरही अनेक पोषक तत्व असतात. जी केसांचं आरोग्य राखण्यासाठी आणि केस लांब, चमकदार करण्यासाठी मदत करतात. हे केसांसाठी एक उत्तम कंडिशनर म्हणूनही काम करतं.
असा तयार करा हेयर मास्क
केसांसाठी अंड्याचा हेयर मास्क करण्यासाठी एका अंड्यामध्ये थोडसं दूध, ऑलिव्ह ऑइल आणि 2 चमचे लिंबाचा रस एकत्र करा आणि तयार पेस्ट केसांच्या मुळांशी लावून व्यवस्थित मालिश करा. एका तासानंतर कस माइल्ड शॅम्पूने धुवून टाका. या हेयर मास्कमध्ये अमिनो अॅसिडदेखील असतं. जे केसांना आवश्यक पोषम देण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर केसांच्या वाढिसाठीही मदत करतात.
ग्रीन टी हेयर मास्क
ग्रीन टी केस गळण्यापासून रोखण्यासाठी 'ब्रम्हास्त्र' आहे. यामध्ये कॅटचिन्स (Catchins) असतं. जे डायहायड्रोटेस्टोस्टेरोन (dihydrotestosterone) कमी करण्यासाठी मदत करतात. डायहायड्रोटेस्टोस्टेरोनचे प्रमाण अधकि झाल्यामुळे केस गळण्यास सुरुवात होते. ग्रीन टी केस पुन्हा येण्यासाठी मदत करते.
असा तयार करा हेयर मास्क
हेयर फॉलसाठी ग्रीन टीचा हेयर मास्क तयार करण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यामध्ये 2 ते 3 चमचे ग्रीन टी टाका. हे व्यवस्थित एकत्र करून केसांच्या मुळांशी लावा आणि थंड पाण्याने धुवून घ्या. यानंतर एखाद्या माइल्ड शॅम्पूने केस धुवून टाका.
केळ्याचा हेयर मास्क
केळ्यामध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन आणि अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे जर केळ्याचा हेयर मास्क लावण्याने केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.
असा तयार करा हेयर मास्क
केळ्यापासून हेयर मास्क तयार करण्यासाठी दोन पिकलेली केळी स्मॅश करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, थोडसं खोबऱ्याचं तेल आणि थोडं मध एकत्र करा. तयार मास्क डोक्याला लावून एक तासांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर शॅम्पूच्या मदतीने धुवून टाका. यामुळे केस गळण्याच्या समस्येसोबतच केसांचा कोरडेपणाही दूर होतो. तसेच केस चमकदार होतात.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.