अमेरिकेत एंटीसेप्टिक साबणावर बॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2016 11:49 AM2016-09-22T11:49:33+5:302016-09-22T17:19:33+5:30
अलीकडेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने अशा 17 पेक्षा अधिक एंटीसेप्टिक साबणावर बॅन आणले आहे
Next
हल्ली कुणीही हात धुण्यासाठी एंटीसेप्टिक साबणाचा उपयोग करतात. त्यामुळे संसर्गापासून संरक्षण होते असे आपल्याला वाटते. परंतु, याचे खरे कारण यापेक्षा उलट आहे. अलीकडेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने अशा 17 पेक्षा अधिक एंटीसेप्टिक साबणावर बॅन आणले आहे. या साबणाचा कोणताही उपयोग नसल्याचे म्हटले आहे. अभ्यासात एंटीसेप्टिक साबण ही सामान्य साबण्यापेक्षा चांगला असल्याचा कोणताच पुरावा मिळालेला नाही.
याअगोदरही एफडीआयने केलेल्या रिसर्चमध्ये समोर आले होते की, एंटीबॉयोटिक्सच्या सतत संपर्कात आल्यामुळे बॅक्टीरीयामध्ये प्रतिरोधक क्षमता विकसित होते. ते सुद्धा खूप धोकादायक आहे. एफडीएने एंटीसेप्टिक उत्पादन करणाºया कंपन्यांना यावर अभ्यास करायलाही सांगितले होते. परंतु, कुणीही अभ्यास केला नाही. ट्राईक्लोजन मनुष्य व प्राण्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करीत असल्याचेही अभ्यासातून समोर आलेले आहे.