पांढरे केस आणि डॅंड्रफची समस्या दूर करण्यासाठी करा 'हा' घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 12:04 PM2019-11-08T12:04:07+5:302019-11-08T12:04:45+5:30
जगभरात वेगवेगळ्या मसाल्यांचे वेगवेगळे फ्लेवर आहेत. पण यात सर्वात हटके फ्लेवर असतो तो काळ्या मिरींचा.
जगभरात वेगवेगळ्या मसाल्यांचे वेगवेगळे फ्लेवर आहेत. पण यात सर्वात हटके फ्लेवर असतो तो काळ्या मिरींचा. काळे मिरे केवळ वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरण्यासोबत याचा केसांसाठीही खूप फायदा होतो. काळ्या मिरीचा केसांची काळजी घेण्यासाठी नियमित वापर कराल तर याचा तुम्हाला बेस्ट रिझल्ट बघायला मिळू शकतो.
चमकदार केस
काळे मिरे केवळ केसांना चमकदारपणा देतात असं नाही तर याने केसांशी संबंधित अनेक समस्या सोडवल्या जातात. पण याचा वापर फार काळजीपूर्वक करावा लागतो. कारण याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केला तर याने डोक्याच्या त्वचेत जळजळ किंवा खाज येऊ शकते. चला जाणून घेऊ काळ्या मिरीचे फायदे....
डॅंड्रफ दूर करा
काळ्या मिरीमध्ये व्हिटमिन सी असतं, जे डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवतं आणि याने डॅंड्रफपासून सुटका मिळते. यासाठी तुम्हाला वर्जिन ऑइलमध्ये चिमुटभर काळे मिरे पावडर टाकावी लागले. ही पेस्ट केसांना लावा. काही तास ही पेस्ट केसांना तशीच लावून ठेवा. नंतर नॉर्मल पाण्याने केस धुवावे.
डोक्याची त्वचा करा स्वच्छ
(Image Credit : maneaddicts.com)
केवळ एक चमचा काळ्या मिरीच्या पावडरमध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिश्रित करा. याने डोक्याची त्वचा स्वच्छ होण्यासोबतच केस मुलायम होतील. हे मिश्रण केसांवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर केस कोमट पाण्याने धुवावे.
पांढरे केस दूर करा
एक चमचा काळे मिरे पावडर आणि त्यात तीन चमचे दही मिश्रित करा आणि केसांवर २० मिनिटांसाठी लावा. नंतर केस पाण्याने धुवावे. काळ्या मिऱ्यांमध्ये कॉपरचं प्रमाण अधिक असतं, याने केस पांढरे होत नाहीत. तसेच दह्याने केस मॉइश्चराइज होतात.
केसांची वाढ होण्यास मदत
(Image Credit : shape.com)
काळ्या मिरीमुळे हेअर फॉलिकल्स स्टीम्यूलेट होतात, सोबतच याने टक्कल पडण्याची समस्या कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला काळ्या मिऱ्यांमध्ये ऑलिव्ह ऑइल मिश्रित करावं लागेल. हे मिश्रण एक डब्यात दोन दिवसांसाठी बंद करून ठेवा. नंतर हे तेल केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस थंड पाण्याने धुवावे.