‘ब्लॅक टी’चे हे आहेत चकित करणारे फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 07:54 AM2017-08-02T07:54:52+5:302017-08-02T13:24:52+5:30

ब्लॅक टीने त्वचेचा रंग तर उजाळतोच तसेच चकाकीही वाढते. याशिवाय अन्य फायदे जाणून घेण्यासाठी क्लिक करा...!

Black Tea's Awesome Benefits! | ‘ब्लॅक टी’चे हे आहेत चकित करणारे फायदे !

‘ब्लॅक टी’चे हे आहेत चकित करणारे फायदे !

Next
लॅक टी म्हणजेच काळा चहा सेवन केल्यास आरोग्यदायी फायदे तर आहेतच शिवाय कोमट करुन त्वचेवर लावल्यास त्वचेचा रंग उजाळतो आणि चकाकीही वाढते. म्हणूनच बहुतेक सेलिब्रिटी ब्लॅक टीचे सेवन करतात. तज्ज्ञांनी याशिवाय अन्य बरेच फायदे देखील सांगितले आहेत. जाणून घेऊया त्या फायद्यांबद्दल... 

Afvallen met Detox thee

* त्वचेचा रंग गोरा होण्यासाठी काळा चहामध्ये कापसाच्या बोळा भिजवून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेचा रंग तर गोरा होतोच शिवाय त्वचेची चमकदेखील वाढते. 

* ब्लॅक टी बॅग्ज डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांभोवतालची डार्क सर्कल्स दूर होण्यास मदत होईल.  

* काळा चहा चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स दूर होऊन चेहऱ्यावरील काळे डागही नाहिसे होतात. 

* शेविंग झाल्यानंतर काळा चहा आफ्टर शेवप्रमाणे लावल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. 

* यात फ्लोराइड असल्याने दात मजबूत होण्यास मदत होते. 

* ब्लॅक टीच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे संक्रमणापासून बचाव होतो आणि सर्दी, पडसे सारखे आजार होत नाहीत. 

* ब्लॅक टीमध्ये पोटॅशियम असल्याने हार्ट प्रॉब्लेम्स दूर होतात. 

* ब्लॅक टीमध्ये अ‍ॅँटीआॅक्सिडेंट्स असल्याने त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. 

* ब्लॅक टीच्या सेवनाने ब्लड शूगर लेवल नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहापासून बचाव होतो. 

* शिवाय या चहामधील अँटीआॅक्सीडेंट्स न्यूट्रिएंट्स अनेक ब्यूटी प्रॉब्लम दूर करतात. यासाठी दूध न टाकता पिलेला चहा जास्त फायदेशीर ठरतो तसेच  यासोबतच साखरेऐवजी मध टाकल्याने आरोग्याला फायदा होईल असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Also Read : ​ग्रीन टीचा प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम
                   : ​HEALTH : ​‘अस्थिमज्जा’वर ग्रीन टी आहे गुणकारी !

 

Web Title: Black Tea's Awesome Benefits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.