प्लॅस्टिक सर्जरीआधी अशा दिसायच्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 11:47 AM2018-08-01T11:47:13+5:302018-08-01T11:52:44+5:30
आपलं सौंदर्य आणखी बहरवण्यासाठी किंवा चिरतरूण दिसण्यासाठी हल्ली अनेक जण प्लास्टिक सर्जरीचा आधार घेताना दिसतात. यामध्ये अनेक बड्या हस्ती, अभिनेत्री आणि मॉडेल्सचा समावेश होतो.
आपलं सौंदर्य आणखी बहरवण्यासाठी किंवा चिरतरूण दिसण्यासाठी हल्ली अनेक जण प्लास्टिक सर्जरीचा आधार घेताना दिसतात. यामध्ये अनेक बड्या हस्ती, अभिनेत्री आणि मॉडेल्सचा समावेश होतो. तसं पहायला गेलं तर प्लॅस्टिक सर्जरीमध्ये प्लास्टिकचा अजिबात उपयोग करत नाहीत. खरं तर ज्या शरीराची सर्जरी करायची आहे त्या शरीराच्या एका अवयवाची त्वचा काढून ती दुसऱ्या अवयवावर जोडण्यात येते. प्लॅस्टिक सर्जरी करण्याची सर्वात जास्त गरज ही त्या लोकांना असते, ज्यांना अपघातात किंवा एखाद्या दुर्घटनेमध्ये शरीराच्या एखाद्या अवयवाला इजा झाली आहे. याव्यतिरिक्त आगीमध्ये भाजलेल्या अथवा अॅसिडहल्ला झालेल्या व्यक्तिंसाठी प्लॅस्टिक सर्जरी एक वरदान ठरले आहे. प्लॅस्टिक सर्जरी 18 पेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ति करू शकते. परंतु आता प्लॅस्टिक सर्जरीच्या व्याख्या बदलल्या आहेत. सध्या सुंदर दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा जास्त वापर करण्यात येतो. एका रिसर्चमधून असे समोर आले होते की, सर्वात जास्त प्लॅस्टिक सर्जरी करण्यात येणाऱ्या देशांमध्ये 2010मध्ये भारत चौथ्या क्रमांकावर होता. परंतु प्लॅस्टिक सर्जरीची व्याख्या आता बदलली असून अनेकजण सुंदर दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा आधार घेतात. अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूडसेलिब्रिटींनी प्लॅस्टिक सर्जरीचा आधार घेतला आहे.
1. प्रियंका चोप्रा
प्रियांकाने काही वर्षांपूर्वी नाकापासून ते ओठांपर्यंत अनेक सर्जरी केल्या असून तिच्या करिअरसाठी त्याचा फार फायदा झाला आहे. त्यानंतर तिच्या सौंदर्यात भर पडली असून अनेक चाहत्यांना तिनं भूरळ घातली आहे. अनेकदा प्रियांकाला तिच्या प्लॅस्टिक सर्जरीबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळीही तिनं आपण इंजेक्शन, लिप फिलर आणि इतर अनेक ट्रिटमेंट केल्या असल्याचं सांगितलं होतं.
2. अनुष्का शर्मा
अनुष्कच्या लिप्ससर्जरीनंतर बॉलिवूडमध्ये अनेक विवाद झाले होते. सुरुवातीला सर्जरीनंतर तिच्या लिप्सची सोशल मीडियावरही खिल्ली उडवली होती. याबाबत अनुष्काला विचारण्यात आल्यावर तिने स्वतः आपण लिप्स सर्जरी केल्याचं मान्य केलं होतं.
3. श्रुति हसन
श्रुतिने नाकाची सर्जरी केल्याचं मान्य केलं होतं. तिने एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले होते की, तिला श्वास घेताना त्रास होत असल्यामुळे तिने सर्जरी करून घेतली.
4. ऐश्वर्या राय-बच्चन
विश्वसुंदरीचा किताब पटकावलेल्या ऐश्वर्यानेही प्लॅस्टिक सर्जरी केल्या आहेत. असं सांगितलं जातं की, तिने लिप फिलर, फेशियल फिलर, नोज जॉब आणि चीक्स इम्प्लांट केलं आहे. तिचा फोटो पाहून या गोष्टी चटकन लक्षात येतात.
5. कतरिना कैफ
बॉलिवूडमध्ये चिकनी चमेली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कटरीनानेही प्लॅस्टिक सर्जरी केल्या आहेत. पण ही गोष्ट तिनं कधी मान्य केली नाही.
प्लास्टिक सर्जरी केल्याने होणारं नुकसान
1 शरीराचं नुकसान
सर्जरीमुळे शरीराच्या अवयवांना नुकसान पोहचू शकते. लिपोसक्शनमुळे शरीराच्या अंतर्गत अवयवांना त्रास होऊ शकतो. जेव्हा सर्जरी करण्यात येते त्यावेळी सर्जरीदरम्यान शरीराच्या आतल्या अवयवांना इजा होते. बऱ्याचदा ही इजा भरून काढण्यासाठी पुन्हा वेगळी शस्त्रक्रिया करावी लागते.
2. रक्ताची कमतरता
प्लॅस्टिक सर्जरी करताना रक्त मोठ्या प्रमाणावर वाया जाते. कोणतीही शस्त्रक्रिया करताना बऱ्याचदा रक्ताची कमतरता आढळते.
3. नसांना नुकसान पोहोचते
प्लॅस्टिक सर्जरीदरम्यान बऱ्याचदा नसांना नुकसान पोहोचते शक्यता आधिक असते. अनेक महिलांना स्तनांच्या शस्त्रक्रियेनंतर शरीर अधिक संवेदनशील जाणवते.