ब्रेडमधील घटकांमुळे होऊ शकतो कॅन्सर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2016 07:03 AM2016-07-20T07:03:06+5:302016-07-20T12:41:42+5:30

ब्रेड म्हणजे पाव...गरिबांपासून ते दिग्गज सेलिब्रिटींपर्यंत सर्वच सकाळी नाश्त्यात बे्रडवर ताव मारताना दिसतात. मात्र जादा ब्रेड खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते

Breeds can be caused by cancer! | ब्रेडमधील घटकांमुळे होऊ शकतो कॅन्सर!

ब्रेडमधील घटकांमुळे होऊ शकतो कॅन्सर!

Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 
रवींद्र मोरे 
 
ब्रेड म्हणजे पाव...गरिबांपासून ते दिग्गज सेलिब्रिटींपर्यंत सर्वच सकाळी नाश्त्यात बे्रडवर ताव मारताना दिसतात. मात्र जादा ब्रेड खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. एका संशोधनानुसार ब्रेडमधील ‘केमिकल्स’मुळे कॅन्सर सारखा भयंकर आजार होऊ शकतो. सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेंट (सीएसई)च्या संशोधनात बे्रडमध्ये कॅन्सर पेशी निर्माण करणारे तत्त्व सापडले आहे. सीएसईच्या संशोधनानुसार ब्रेड, बन, बर्गर आणि पिज्जाच्या ३८ लोकप्रिय ब्रॅँडमध्ये ८० टक्के पोटॅशीयम ब्रोमेट आणि आयोडेट असतात. पोटॅशीयम ब्रोमेट हे कॅन्सरच्या पेशीसाठी कारक ठरतात तर आयोडेटपासून थायरॉइडचा आजार होण्याची शक्यता बळावते. 
संशोधनानुसार बे्रडचे भारतीय उत्पादक पिठात पोटॅशीयम ब्रोमेट आणि आयोडेटचा वापर करतात. सीएसईच्या निकषानुसार अनेक देशात बे्रेड तयार करताना या केमिकल्सच्या वापरावर बंदी आहे. मात्र भारतात यावर कोणतीही बंदी नाही. सीएसईच्या पॉल्यूशन मॉनिटरिंग लॅबोरेटरीच्या संशोधनकर्त्यांना ८४ टक्के सॅँपलमध्ये पोटॅशियम ब्रोमेट तथा आयोडेट आढळला. त्यांनी या सँपलच्या लेबलची तपासणी केली. तसेच याबाबत जानकार तसेच उत्पादकांशी चर्चा केली. आता सीएसईने तात्काळ पोटॅशियम ब्रोेमेट आणि आयोडेटच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. पोटॅशीयम ब्रोमेट बहुतांश  देशांमध्ये प्रतिबंधित आहे. तपासणीनुसार ब्रेड उत्पादक लेबलवर या तत्त्वांच्या बाबतीत उल्लेख करीत नाही. 
 
प्रश्न पिठाचा नव्हे तर केमिकल्सचा?
घराघरात चपाती बनणाºया पिठापासूनच तर ब्रेड बनतो. आणि त्यापासून कॅन्सरसारखा भयंकर आजार कसा होऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर हे आहे की, प्रश्न पिठाचा नसून, ब्रेड बनविण्यासाठी वापरण्यात येणाºया केमिकल्सचा आहे. आणि हे केमिकलवर जगातील बºयाच देशांमध्ये बंदी करण्यात आली आहे. 
 
या देशांत आहे बंदी 
भारतात निर्मित होणाºया ब्रेडमध्ये पोटॅशीयम ब्रोमेट आणि पोटॅशीयम आयोडेट हे केमिकल्स आढळले आहेत. भारतात या केमिकल्सचा मोठ्यप्रमाणात वापर होताना दिसतो. युरोपियन संघ, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, चीन, श्रीलंका, ब्राजील, नायजेरिया, पेरू  आणि कोलंबिया या देशात या केमिकल्सवर पूर्णत: बंदी आहे. 
 
गंभीर आजाराचा धोका
भारतात निर्मित केल्या जाणाºया ब्रेडवर क रण्यात आलेल्या संशोधनात मुख्य भूमिका निभविणारे सेंटर फॉर सायन्स एंड एनव्हायर्मेंटचे चंद्रभूषण सांगतात की, एकच नव्हे तर, बºयाच संशोधनात हे आढळून आले आहे की, पोटॅशीयम ब्रोमेट पोटाच्या कॅन्सर आणि किडनीच्या पथरी आजाराशी संबंधित आहे. 
 
दुर्लक्षित न करता येणारे धोके
ब्रेड खाल्ल्याने होणारा धोका आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. पोटॅशीयम ब्रोमेट हे केमिकल सतत शरीरात गेल्याने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. याच प्रमाणे पोटॅशीयम आयोडाइट मुळे थायराइडशी संबंधित समस्या उद्भवतात.
 
ब्रेडला आकर्षक बनविण्यासाठी केमिकल्सचा वापर
ब्रेडला सफेद रंग यावा तसेच मुलायम व्हावा आणि व्यवस्थित फुलविण्यासाठी ब्रेड बनविणाºया कंपन्या पिठात या केमिकल्सचा वापर करतात.  
 
पाकिटावर नाही दिली जात माहिती
ब्रेड बनविण्यासाठी पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेटचा वापर केला जातो, हे ब्रेड बनविणाºया कंपन्या ब्रेडच्या पाकिटावर कधी लिहीतच नाही. चंद्रभूषण सांगतात की, चौकशीसाठी नमुने फक्त दिल्लीहून घेण्यात आले होते, मात्र ही व्यथा तर पूर्ण देशात एकसारखी आहे. कारण ब्रेड बनविणाºया जास्तीत जास्त कंपन्या पूर्ण देशात एकच सारखा ब्रेड पुरवठा करतात

Web Title: Breeds can be caused by cancer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.