'हे' बेबी प्रोडक्ट्स मोठ्यांसाठीही ठरू शकतात उपयुक्त, असा करू शकता वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 08:08 PM2019-01-28T20:08:53+5:302019-01-28T20:09:08+5:30

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला कोणतेही उपाय करण्यासाठी तयार असतात. त्या सतत नवनवीन ब्युटी प्रोडक्ट्सचा शोध घेतच असतात. अनेकदा अनेक महिला असे प्रोडक्ट्स शोधत असतात, जे थोडेसे वेगळे आणि कमी वेळात जास्त फायदा देणारे असतात.

Brilliant ways to use common baby products for adults or womens | 'हे' बेबी प्रोडक्ट्स मोठ्यांसाठीही ठरू शकतात उपयुक्त, असा करू शकता वापर

'हे' बेबी प्रोडक्ट्स मोठ्यांसाठीही ठरू शकतात उपयुक्त, असा करू शकता वापर

Next

(Image Creadit : tinystep.in)

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला कोणतेही उपाय करण्यासाठी तयार असतात. त्या सतत नवनवीन ब्युटी प्रोडक्ट्सचा शोध घेतच असतात. अनेकदा अनेक महिला असे प्रोडक्ट्स शोधत असतात, जे थोडेसे वेगळे आणि कमी वेळात जास्त फायदा देणारे असतात. वेगवेगळ्या क्रिम, लोशन आणि मॉयश्चरायझर वापरण्यासाठी सध्या कोणाकडे वेळ नसतो. त्यामुळे प्रत्येकजण कमी वेळात जास्त फायदा देणाऱ्या प्रोडक्ट्सचा शोध घेत असतात. 

लहान मुलांसारखी कोमल त्वचा आपलीही असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी प्रत्येकजण बाजारात मिळणाऱ्या अनेक स्किन केअर प्रोडक्ट्सचा करतात. जे कधी-कधी त्वचेसाठी नुकसानदायी ठरतात. यामुळे त्वचेला अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो. खरं तर बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये केमिकल्स असतात. जे त्वचेवर पिंपल्स, ओपन पोर्स, काळपटपणा, लालसर चट्टे यांसारख्या समस्यांसाठी कारणीभूत ठरतात. तुम्हालाही या सर्व समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्हीही बेबी प्रोडक्ट्सचा वापर करू शकता. तज्ज्ञांच्या मते, या प्रोडक्ट्समध्ये कोणत्याही प्रकारचे हानिकारक केमिकल्स आढळून येत नाहीत. त्यामुळे हे प्रोडक्ट्स वापरल्याने त्वचेला नुकसान पोहोचत नाही. याशिवाय हे प्रोडक्ट्स अॅन्टी-एलर्जीकही असतात. जे कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक ठरतात. 

बेबी ऑइल 

ज्या महिला नियमितपणे मेकअप करतात. त्यांना घरी आल्यानंतर मेकअप काढून टाकण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. तुम्ही मेकअप काढून टाकण्यासाठी बेबी ऑइलची मदत घेऊ शकता. यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही. बेबी ऑइलमध्ये मिनरल ऑइल असतात. जे त्वचा मुलायम करण्यासाठी मदत करतात. 

बेबी लोशन

अनेकदा त्वचा मुलायम ठेवण्यासाठी बॉडी लोशनचा वापर करण्यात येतो. खरं तर बॉडी लोशन थोडे चिकट असतात. त्यामुळे अशा बॉडी लोशन्सचा वापर कल्यामुळे त्वचा चिकट होते. अशातच तुम्ही बेबी लोशनचा वापर करू शकता. कारण बेबी लोशन नॉन-स्टिकी असतात. त्याचबरोबर बेबी लोशन प्रोटेक्टिव्ह लेयरप्रमाणे काम करतं. जे त्वचेला इन्फेक्शनपासून वाचवतं.

बेबी पावडर

बेबी पावडरचा वापर तुम्ही तुमच्या मेकअपसोबतही करू शकता. फाउंडेशन लावल्यानंतर हल्की बेबी पावडर चेहरा आणि गळ्यावर लावा. यामुळे मेकअप चेहऱ्यावर बराच काळ टिकण्यासाठी मदत होते. 

Web Title: Brilliant ways to use common baby products for adults or womens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.