थोडा सन्नाट चाहिए भाई...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2016 10:34 AM2016-07-12T10:34:11+5:302016-07-12T16:04:11+5:30
ट्रॅफिक गोंगाटाजवळ राहणाऱ्या ४० पेक्षा जास्त वयाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची नऊ टक्के अधिक शक्यता असते.
Next
आ ल्या मोबाईलचा सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता तर अर्धेअधिक तरुण फिल्म पाहणे आणि गाणे ऐकणे असे सांगतील. हजारो गाणे क्रिस्टल क्लिअर आवाजात हेडफोन टाकून ऐकण्याचा आनंद काय तो सांगावा! आपण शहरात राहतो, कॉन्सर्टला जातो, पॉडकास्ट ऐकत आॅफिसला जातो. पण सतत कानात काही ना काही टूरटूर सुरू असणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
जर्मनीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, रस्ता, रेल्वे आणि ट्रॅफिक गोंगाटाजवळ राहणाऱ्या ४० पेक्षा जास्त वयाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची नऊ टक्के अधिक शक्यता असते. साधारण ६० ते ६५ डेसिबल एवढा आवाज असतो तो. हा आवाज काही फार मोठा नाही. आपण नॉर्मली बोलतो तेव्हा ६० डेसिबल, टीव्हीचा ७० डेसिबल आवाज असतो. पण ट्रॅफिकचा गोगोंट लगातार दीर्घकाळ कानावर पडत असल्यामुळे घातक ठरतो.
याउलट दीर्घकाळ शांततेमुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते असे निष्पन्न झाले आहे. जे लोक सतत गोंधळ-आवाजाजवळ राहतात त्यांच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन्स जास्त रिलीज होतात. दुसऱ्या एका अध्यनातून असे समोर आले की, दोन तासांच्या शांततेमुळे उंदरांच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागातील पेशींचा विकास होतो आणि त्यातून स्मरणशक्ती वाढते. म्हणजे अधूनमधून शहरापासून थोडं दूर. शांतनिवांत ठिकाणी बसून विचार करायला हरकत नाही.