त्वचा आणि केसांसाठी कापूर ठरतो फायदेशीर; असा करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 03:40 PM2019-03-11T15:40:02+5:302019-03-11T15:40:33+5:30

हिंदू संस्कृतीमध्ये कापराला धार्मिक महत्त्व असून देव-देवतांची आरती करताना कापूर लावण्याची प्रथा फार पूर्वीपासूनच प्रचलित आहे. परंतु कापराचा उपयोग फक्त धार्मिक विधिंसाठी न करता एक नैसर्गिक औषधी म्हणूनही करण्यात येतो.

Camphor is beneficial for hair and skin | त्वचा आणि केसांसाठी कापूर ठरतो फायदेशीर; असा करा वापर!

त्वचा आणि केसांसाठी कापूर ठरतो फायदेशीर; असा करा वापर!

googlenewsNext

हिंदू संस्कृतीमध्ये कापराला धार्मिक महत्त्व असून देव-देवतांची आरती करताना कापूर लावण्याची प्रथा फार पूर्वीपासूनच प्रचलित आहे. परंतु कापराचा उपयोग फक्त धार्मिक विधिंसाठी न करता एक नैसर्गिक औषधी म्हणूनही करण्यात येतो. अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण कापूर शरीर आणि डोकं दोन्ही शांत ठेवण्यासाठी मदत करतो. याशिवाय सांधेदुखी, भाजलं किंवा कापल्यामुळे झालेली जखम आणि इतर आरोग्याशी निगडीत समस्यांसाठीही कापराचा वापर केला जाऊ शकतो. आरोग्यासोबतच त्वचेसाठीही कापूर अत्यंत फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया कापराचा वापर त्वचेसाठी केल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत...

त्वचेला थंडावा देण्यासाठी

कापूर त्वचेला अॅलर्जी किंवा अन्य कारणांमुळे येणाऱ्या खाजेपासून सुटका करण्यासाठी मदत करतो. खाज येणाऱ्या त्वचेवर कापराचा लेप लावल्याने तो रोम छिद्रांमध्ये शोषला जातो आणि त्वचेला थंडावा देण्यासाठी मदत करतो. यासाठी एक कप नारळाच्या तेलामध्ये एक चमचा कापराची पूड एकत्र करा. तयार पेस्ट खाज येणाऱ्या ठिकाणी 1 ते 2 वेळा लावा. त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होईल. 

पिंपल्सवर उपाय म्हणून

कापूर बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतं. पिंपल्सची समस्या अनेकदा त्वचेवर तयार होणाऱ्या बॅक्टेरियामुळे उद्भवते. कापूर एका अॅन्टीइंफेक्टिव एजंटच्या रूपामध्ये काम करतं. एका रिसर्चनुसार, कापूर ऑयली स्किन असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतं असून पिंपल्सवर उपचार करण्यासाठी अत्यंत उपयोग ठरतो. 

भाजलेल्या त्वचेवर फायदेशीर 

जर तुम्हाला काम करताना एखाद्या गोष्टीचा चटका लागला किंवा थोडसं भाजलं असेल तर त्यावर कापूर लावणं फायदेशीर ठरतं. फक्त जखमच नाही तर जखमेचे निशाण दूर करण्यासाठीही मदत करतं. 

केसांसाठी फायदेशीर

केस गळणं किंवा कोरडे होणं यांवर उपाय करण्यासाठी आणि केसांच्या मजबुतीसाठी कापूर फायदेशीर ठरतो. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, नारळाच्या तेलासोबत कापूर एकत्र करून मालिश केल्याने केसांना पोषण मिळतं. 

कापूर काही प्रमाणात नुकसानकारक 

- जास्त प्रमाणात कापराचे तेल त्वचेवर थेट लावल्यास जळजळ होऊ शकते. एखाद्या तेलासोबत एकत्र करून त्यानंतरच कापराचे तेल त्वचेवर लावा. 

- दोन वर्षांपासून कमी वयाच्या मुलांसाठी कापराचा वापर करू नये. हे त्यांच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. 

-  गरोदर स्त्रियांनी कापराचा वापर करणं टाळावं. कारण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी ते धोकादायक ठरू शकतं. 

टिप : वरील उपाय घरगुती आहे आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Camphor is beneficial for hair and skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.