रोज चेहऱ्यावर तुरटी लावू शकता का? जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 02:24 PM2024-09-14T14:24:57+5:302024-09-14T14:25:30+5:30
Alum on Face Everyday: अनेकांना असा प्रश्न पडतो की, रोज तुरटी वापरणं सुरक्षित असतं की नाही? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
Can We Use Alum on Face Everyday: तुरटीचा वापर फार पूर्वीपासून त्वचेसाठी केला जातो. तुरटी एक बेस्ट आफ्टर शेव्ह मानली जाते. पण आजकाल याचा वापर कमी झाला आहे. तुरटी एक नॅचरल मिनरल आहे, ज्याचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. फार आधीपासून लोक तुरटी चेहऱ्यावर लावतात. ज्यामुळे इन्फेक्शन, बॅक्टेरियाचा धोका कमी होतो. इतकंच नाही तर त्वचेवरील डागही याने दूर होतात. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, रोज तुरटी वापरणं सुरक्षित असतं की नाही? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
रोज तुरटी वापरू शकता?
एका एक्सपर्टनुसार, 'तुरटीचा चेहऱ्यावर वापर केल्याने काही फायदे मिळतात. पण या फायद्यांचे वैज्ञानिक पुरावे कमी आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेवर याचे फायदे आणि नुकसान वेगवेगळे असू शकतात. काही लोकांची त्वचा फार जास्त सेन्सिटिव्ह असते, अशा लोकांनी तुरटीचा वापर करणं टाळलं पाहिजे'.
चेहऱ्यावर तुरटी लावण्याचे काही फायदे...
- ऑयली स्कीनसाठी फायदेशीर
तुरटीमध्ये असे काही गुण असतात जे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल दूर करण्यास मदत करतात. याने ऑयली स्कीनची समस्या दूर होते आणि चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा धोकाही कमी राहतो.
पिंपल्स होतील दूर
तुरटीमध्ये अॅंटीसेप्टिक गुण असतात जे पिंपल्स निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. सोबतच तुरटी अतिरिक्त सीबम उत्पादन नियंत्रित करू शकतं. जे पिंपल्स एक मुख्य कारण आहे.
रोमछिद्रे टाइट करते
तुरटीने त्वचेवरील रोमछिद्रे टाइट करण्यास मदत मिळते. ज्यामुळे त्वचा आणखी तजेलदार आणि चमकदार दिसते.
तुरटीने होतात काही नुकसान
ड्राय स्कीन
तुरटीमुळे त्वचेवरील नॅचरल तेल शोषूण घेतलं जातं. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि रखरखीत दिसते.
जळजळ आणि खाज
तुरटीमधील काही गुणांमुळे संवेदनशील त्वचेवर जळजळ आणि खास येण्याची समस्या होऊ शकते.
एलर्जी
सगळ्यांना तुरटीचे फायदे होतात असं नाही. काही लोकांना याने एलर्जी सुद्धा होऊ सकते. ज्यामुळे त्वचेवर लाल चट्टे, सूज आणि खाज येऊ शकते.
याच कारणांनी त्वचेवर तुरटीचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी थोडी तुरटी हातावर लावून बघा. जर लाल चट्टा किंवा जळजळ होत असेल तर तुरटीचा वापर करू नका. असं काही होत नसेल तर तुरटीचा वापर करावा.