३० मिनिटात होऊ शकते कॅन्सरचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2016 01:39 PM2016-09-27T13:39:59+5:302016-09-27T19:09:59+5:30

केवळ ३० मिनिटात कॅन्सर आहे किंवा नाही याची माहिती देऊ शकते.

Cancer can be diagnosed in 30 minutes | ३० मिनिटात होऊ शकते कॅन्सरचे निदान

३० मिनिटात होऊ शकते कॅन्सरचे निदान

Next

/>कोचीमधील अमृता विद्यापीठातील वैज्ञानिकांनी कॅन्सरचे एक असे  उपकरण  विकसित के ले आहे. की, हॉस्पिटलमध्ये न जाताच, ते  चार वर्षापूर्वी अमृता विद्यापीठाचे नॅनो मेडिसीन केंद्राचे वैज्ञानिक शांतीकुमार वी नायर व मंजूर कोयाकूट्टी हे विषारी घटक शोधण्यासाठी लेसरने काम करीत होते. तर त्यांना काही वेगळ्या गोष्टी समजल्या. यावर विचार केल्यानंतर डॉ. नायर यांना वाटले की, याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.
मनुष्याच्या शरीरात कॅन्सर पेशी ओळखणे असा प्रयोग तो होता. त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाºयांना घेऊन यावरती काम सुरु केले. त्यामुळे हे उपकरण विकसित झाले. त्यामुळेच अर्धा तासातच कॅन्सर आहे की, नाही हे ओळखले जाऊ शकते.

सध्या या तंत्रावर काम सुरु असून, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे पूर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो.  शांतीकुमार यांच्या नियंत्रणाखाली वैज्ञानिकांची तीन सदस्यीय टीम यावर क ाम करीत आहे. कॅन्सर डिटेक्शन तंत्रामध्ये लेसर व नॅनौ सब्सट्रेक्टचा यामध्ये प्रयोग आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर जगभरातील कॅन्सर भीती दूर होऊ शकते.

Web Title: Cancer can be diagnosed in 30 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.