मेणबत्तीच्या सहाय्याने पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा करा दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 02:41 PM2018-10-31T14:41:18+5:302018-10-31T14:56:14+5:30
थंडीमध्ये अनेकांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकांना पडलेल्या टाचांच्या भेगा तर आणखी वाढत जाऊन गंभीर रूप घेतात. अनेकदा या भेगाळलेल्या टाचांमुळे चारचौघात मान खाली घालण्याचाही प्रसंग येतो.
थंडीमध्ये अनेकांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकांना पडलेल्या टाचांच्या भेगा तर आणखी वाढत जाऊन गंभीर रूप घेतात. अनेकदा या भेगाळलेल्या टाचांमुळे चारचौघात मान खाली घालण्याचाही प्रसंग येतो. अशातच अनेक क्रिम्स किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरण्यात येतात. परंतु यामध्ये अनेक दिवस जातात आणि त्याचा फायदा मिळत नाही. जर तुम्हालाही तुमच्या टाचांना पडलेल्या भेगांपासून सुटका करून घ्यायची असेल तर तुम्ही एक सहज सोपा उपाय ट्राय करू शकता. यासाठी तुम्हाला मेणबत्तीची गरज लागेल. जाणून घेऊयात मेणबत्तीच्या सहाय्याने पायाच्या टाचेला पडलेल्या भेगा दूर करण्याबाबत...
साहित्य :
- मोहरी, बदाम किंवा खोबऱ्याचं तेल
- एखादी मेणबत्ती
- काचेचं भांडे
कृती :
- सर्वात आधी मेणबत्तीची वात काढून टाका.
- त्यानंतर खोबऱ्याचं किंवा बदामाचं तेल एका भांड्यामध्ये ओतून गरम करून घ्या.
- यानंतर मेणबत्ती टाकून व्यवस्थित वितळवून घ्या.
- तेलामध्ये मेण व्यवस्थित वितळल्यानंतर गॅसवरून उतरवून घ्या.
- थंड झाल्यानंतर हे मिश्रण व्हॅसलिनप्रमाणे दिसेल.
- हे मिश्रण तीन दिवसांपर्यंत टाचेला पडलेल्या भेगांवर लावून मसाज करा.
- तुम्हाला फरक जाणवेल. पायांच्या टाचा मुलायम होतील.