ड्राय स्किनसाठी उपाय करून कंटाळलायतं?; घरीच करा 'हा' फेसमास्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 01:26 PM2019-06-20T13:26:16+5:302019-06-20T13:29:03+5:30
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि डायट्री फायबर्स मुबलक प्रमाणात असलेलं गाजर फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं.
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि डायट्री फायबर्स मुबलक प्रमाणात असलेलं गाजर फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. तुम्ही दररोज गाजराचे सेवन केलं तर त्वचेवरील पिंपल्स आणि डाग दूर होण्यास मदत होते. गाजरामध्ये अनेक गुणधर्म असतात. त्यांचा वापर जर फेसपॅक किंवा फेसमास्कसाठी केला तर त्वचेचा उजाळा आणखी वाढतो. यामध्ये असलेले अॅन्टी-ऑक्सिडंट्स त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. गाजरापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फेसपॅक आणि फेसमास्क तयार करून वापरू शकता.
गाजर किसून तयार करा मास्क...
गाजर तुमच्या स्किनला मॉयश्चराइज करण्यासोबतच ड्रायनेस दूर करण्यासाठी मदत करतं. जवळपास अर्ध गाजर किसून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारिक करा. त्यामध्ये एक चमचा मध एकत्र करा आणि एक चमचा दूध किंवा मलई एकत्र करा. सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा. 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. गाजर आणि मलई चेहऱ्यावरील ड्रायनेस दूर करण्यासोबतच त्वचा उजळवण्यासाठीही मदत करतात.
पाण्यात उकडून तयार करा...
तुम्ही शक्य असेल तर चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी गाजराचा अनेक प्रकारे उपयोग करू शकता. 2 ते 3 गाजर उकडून व्यवस्थित स्मॅश करा आणि त्यामध्ये मध एकत्र करा. व्यवस्थित एकत्र केल्यानंतर तयार पेस्ट स्किनवर थोड्या वेळासाठी लावून ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. यामुळे ड्रायस्किनची समस्या दूर होण्यास मदत होते.
सन प्रोटेक्शनसाठी...
तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की, तुमच्या त्वचेला यूवी किरणांपासून वाचवण्याचं कामही गाजर करतं. गाजराचा ज्यूस गुलाब पाण्यासोबत समप्रमाणात एकत्र करा. त्यानंतर हे एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि त्वचेवर स्प्रे करत राहा. तयार मिश्रण तुमच्या त्वचेचं सूर्याच्या यूवी किरणांपासून रक्षण करण्याचं काम करतं.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.