स्ट्रेच मार्क्सवर उपाय शोधत आहात?, मग हे वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 01:39 PM2018-05-30T13:39:51+5:302018-05-30T13:39:51+5:30

शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे हवे तसे कपडे घालायला मिळत नाहीत, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते.

causes and treatments of stretch marks | स्ट्रेच मार्क्सवर उपाय शोधत आहात?, मग हे वाचा 

स्ट्रेच मार्क्सवर उपाय शोधत आहात?, मग हे वाचा 

मुंबई - शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे हवे तसे कपडे घालायला मिळत नाहीत, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. पोट, पाठ, छाती, पार्श्वभाग, मांड्या आणि हातांवर स्ट्रेच मार्क येतात. गर्भावस्थेनंतर अधिकतर महिलांना स्ट्रेच मार्क्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. 
कित्येक पुरुष आणि महिलांच्या शरीरावर वजन वाढल्यानं किंवा हार्मोन्समधील बदलांमुळे स्ट्रेच मार्क दिसू लागतात. याशिवाय, स्टेरॉइडच्या वापरामुळेही स्ट्रेच मार्कची समस्या निर्माण होते. 
- स्ट्रेच मार्क्सवर उपाय 
1. स्ट्रेच मार्क्ससाठी अनेक उपचार आहेत, मात्र ते पूर्णतः गायब होत नाहीत.  
2. लेझर ट्रिटमेंटसोबत ट्रेटिनोईन आधारित क्रीम, जेल आणि लोशनच्या मदतीनं स्ट्रेच मार्क कमी होण्यास मदत मिळू शकते. 
3.  प्रेग्नन्सीनंतर पोट आणि नाभी (बेंबी) च्या आसपास आलेल्या स्ट्रेच मार्क्सवर सर्जरीद्वारे उपाय करता येऊ शकतात. यामध्ये त्वचेला पूर्णतः काढण्यात येते. 
4. याशिवाय, स्ट्रेच मार्क्स येऊ नयेत, यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. वजन नियंत्रणात राहील अशा जीवनशैलीचे अनुसरण करावे. 
5. गर्भवती महिलांनी अधिकाअधिक पाणी प्यावे.
8. नियमित व्यायाम करावा. 
 9. तेलकट त्वचेऐवजी कोरड्या त्वचेवर लवकर स्ट्रेच मार्कची समस्या निर्माण होते. 
10. आपल्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानुसार डाएट फॉलो करावा.
11. आहारामध्ये व्हिटामिन ए, सी आणि डी यांचा समावेश करावा.  

Web Title: causes and treatments of stretch marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.