'या' कारणांमुळे येते शरीराची दुर्गंधी, कुणी दूर पळण्याआधी व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:10 PM2019-03-26T13:10:51+5:302019-03-26T13:13:17+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना खूप जास्त घाम येतो. त्यामुळे लोकांना वाटतं की, या घामामुळेच शरीराची दुर्गंधी येते. पण असं नाहीये.
(Image Credit : inc.com)
उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना खूप जास्त घाम येतो. त्यामुळे लोकांना वाटतं की, या घामामुळेच शरीराची दुर्गंधी येते. पण असं नाहीये. खरंतर घामाला कोणताही वास नसतो. जेव्हा शरीरातील बॅक्टेरिया घामात मिसळतात तेव्हा घामाची दुर्गंधी येऊ लागते. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळेही शरीराची दुर्गंधी येते. यासोबतच आणखीही काही कारणे आहेत ती खालीलप्रमाणे सांगता येतील.
तणाव
तणाव असल्यावर शरीरातून घाम अधिक निघतो. यादरम्यान शरीरात कॉर्टिसोल हार्मोन अधिक रिलीज होतात. ज्यामुळे असं होतं. जास्त प्रमाणात निघालेला घाम जेव्हा बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो तेव्हा दुर्गंधी येऊ लागते.
कपड्यांची निवड
सिंथेटिक कापडही अनेकजण उकाड्याच्या दिवसात परिधान करतात. पण याने घाम शोषला जात नाही. कॉटन फॅब्रिक फार जास्त घाम शोषतो. जर तुम्हाला अधिक घाम येत असेल तर तुम्ही रेयॉन आणि पॉलिस्टरसारखे कापड वापरणे बंद करा. या कापडामुळे घाम शोषला जात नाही आणि त्यामुळे बॅक्टेरिया अधिक होतात. त्यामुळे दुर्गंधी येऊ लागते.
अत्तराचा वापर
अत्तरामुळेही घामाची दुर्गंधी येते. खरंतर हे त्याच अत्तरासोबत होतं ज्या अत्तरांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण नसतात. अशात बॅक्टेरिया वाढू लागतात आणि शरीराची दुर्गंधी येते.
औषधांचं सेवन
जर तुम्ही फार जास्त औषधे घेत असाल तर याचा प्रभाव तुमच्या शरीरावरही होतो. औषधांमधील रासायनिक तत्व शरीराच्या गंधाला प्रभावित करतात. अशात घाम आणि शरीराचा गंध मिळून दुर्गंधी निर्माण होते.
मसालेदार पदार्थ
फार जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत.