'या' कारणांमुळे कमी वयातच पुरूषांच्या डोक्याला टक्कल पडतं; सोप्या उपायांनी मिळवा दाट केस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 09:00 PM2020-09-16T21:00:19+5:302020-09-16T21:00:43+5:30
वसेंदिवस तुमचे केस जास्त पातळ होत असतील तर मेल पॅटर्न बाल्डनेसची समस्या असू शकते. ही समस्या उद्भवल्यास हेअरलाईन्स कमी होतात.
पुरूषांना डोक्याला टक्कल पडण्याची समस्या उद्भवणं यात काही नवीन नाही. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्यातील अनियमितीता यामुळे केस गळण्याची समस्या जास्त वाढते. केस गळणं सामान्य असलं तरी अति केसांचे गळणं केसांना टक्कल पडण्याचं कारण ठरतं. त्यामुळे संपूर्ण लूक बिघडतो. अनेकदा एंड्रोजेनिक एलोपेसिया ही समस्या उद्भवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर केस गळतात. दिवसेंदिवस तुमचे केस जास्त पातळ होत असतील तर मेल पॅटर्न बाल्डनेसची समस्या असू शकते. ही समस्या उद्भवल्यास हेअरलाईन्स कमी होतात.
घरात कोणाचेही केस गळत असतील तर अनुवांशिकतेमुळे हे समस्या उद्भवू शकते. हार्मोनल बदलांचा केसांवरही परिणाम होत असतो. शरीरात आयर्नची कमतरता असणं, डायबिटिस, कुपोषण, फंगल इन्फेक्शन, ताण तणाव आणि औषधांच्या सेवनामुळे केस गळतात. हाय ब्लड प्रेशरचे शिकार असाल तर केसगळतीची समस्या होऊ शकते. कारण या स्थितीत ब्लड आर्टरीजवर ब्लड फ्लोचं अधिक प्रेशर असतं. ब्लडमध्ये सोडिअमचं प्रमाण अधिक असतं. ही स्थिती हृदयासोबतच केसांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक असते.
डिप्रेशनमुळेही केसगळती वेगाने होऊ लागते. कोणतीही व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याआधी जास्त काळासाठी चिंता आणि तणावाच्या स्थितीत असते. या स्थितित शरीरात आवश्यक हार्मोन्सची निर्मिती होत नाही आणि पचनक्रियाही बिघडू शकते. यानेच केसांना आवश्यक ते पोषण मिळत नाही.
स्लीम फिट शरीराच्या आकर्षणामुळे तरूण लोक एनॉरेक्सिया आणि बुलिमियासारख्या ईटिंग डिसऑर्डरचे शिकार होतात. या तरूणांमध्ये जास्तीत जास्त संख्या मुलींची आणि महिलांची असते. शरीरातील इतर समस्यांसोबतच ईटिंग डिसऑर्डर हे सुद्धा केसगळतीचं एक मुख्य कारण बनत आहे. कारण आपल्या शरीराला गरजेचं न्यूट्रिएंट्स पोहोचू शकत नाही आणि पोषण मिळत नसल्याने केसगळती होऊ लागते.
उपाय
केसांसाठी नारळाच्या तेलाचा वापर योग्य प्रकारे करायला हवा. नारळाच्या तेलात ३ ग्राम कापूर दळून घाला. हे तेल रोज रात्री केसांना लावून केसांच्या मुळांची मसाज करा. दररोज या तेलाने मसाज केल्यास फरक दिसून येईल. तसंच केल मऊ आणि मुलायम होतात. केसांना पोषण मिळाल्यामुळे गळती थांबते.
केस गळणं थांबवण्यासाठी ५ टेबसस्पून मेंहेदीची पाऊडर आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस तसंच १ अंड्याचा पांढरा भाग आणि १ टेबलस्पून मेथी, ४ टेबलस्पून आणि दही घालून रात्रभर भिजवा आणि केसांना लावा. त्यानंतर २-३ तासांनी केस धुवून टाका असे केल्यास फरक दिसून येईल. केस चमकदार दिसतील.
कोरफड फाडून घेतल्यानंतर त्यातील जेल काढा. त्यातील जेल तुमच्या केसांना मुळापासून लावा. एक तास हे असंच राहू द्या आणि नंतर शँपूने तुमचे केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. कोरफडीमध्ये केसांसाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
केसांना पोषण मिळण्यासाठी अर्धा कप दही घ्या आणि त्यात २ टेबलस्पून मेधी घाला. तसंच ३ आवळे त्यात मिसळा. सकाळी याची पेस्ट तयार करून केसांना लावा. हे मिश्रण लावल्यानंतर केसांना २ ते ३ तास राहू दया असे केल्यास केस कोरडे पडणार नाहीत. तसंच लिंबाचा रस आणि नारळाचं तेल मिसळून केसांना लावा आणि २ तासांनी केस धुवून टाका. यामुळे केस गळण्याच्या समस्येपासून आराम मिळेल. तसंच केस घनदाट दिसतील. घरगुती साहीत्याचा वापर करून जर तुम्ही केसांची काळजी घेतली तर तुम्हाला केमिकल्सचा वापर न करता चांगले केस मिळवता येतील.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)
हे पण वाचा-
काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा
मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध
अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा
'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा