च्युईंगम खाताय !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2016 07:54 AM2016-08-04T07:54:17+5:302016-08-04T13:34:21+5:30

च्युईंगम खाणा-यांमध्ये सर्वाधिक संख्या ही लहान मुलं, प्रोफेशनल, क्रीडापटू, कॉलेज तरुण-तरुणी यांची जास्त असते.

Chewingam accountable! | च्युईंगम खाताय !

च्युईंगम खाताय !

Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">ब-याच जणांना च्युईंग चघळण्याची सवय असते. चॉकेलेटसारखं च्युईंग विरघळत नाही त्यामुळं तासनतास ते चघळणं आणि च्युईंगमचे फुगे करत त्याचा आनंद घेणं अनेकांना आवडतं. अनेकजण काम करताना च्युईंगम चघळतात. कुणाशी बोलतानासुद्धा ते च्युईंगम चघळणं सोडत नाही. याचाच अर्थ असा की च्युईंगम जणू काही त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनलाय.च्युईंगम खाणा-यांमध्ये सर्वाधिक संख्या ही लहान मुलं, प्रोफेशनल, क्रीडापटू, कॉलेज तरुण-तरुणी यांची जास्त असते.
 
या कारणांसाठीही चघळतात च्युईंगम 
 
गुडा सिपॅक नावाच्या झाडाच्या फांद्यांचा चीक, सुगंधी पेपासीन तसंच साखर आणि अन्य द्रव्यांच्या योग्य मिश्रणापासून च्युईंगम तयार केलं जातं. एकदा का च्युईंगम चघळण्याची सवय लागली ती सुटणं कठीण असं म्हटलं जातं. त्यामुळं च्युईंगम चघळण्याचे फायदे तोटे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचे आहे. गळ्याला पडलेली कोरड दूर करण्यासाठी काही च्युईंगम चघळतात. काही जण तहान रोखण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी च्युईंगम चघळतात. खेळाडूंमध्ये च्युईंगम चघळण्याचं प्रमाण सर्वाधिक आढळतं. च्युईंगम चघळल्याने एकाग्रता वाढते असंही म्हटलं जातं. याशिवाय खेळताना स्फूर्ती मिळावी यासाठीही अनेक खेळाडू च्युईंगमचाच आधार घेत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. याशिवाय काही जण तणाव दूर करण्यासाठी तर काही तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही च्युईंगम चघळत असल्याचं आढळतं.
 
च्युईंगम चघळतानाचे वैज्ञानिकदृष्ट्या फायदे 
एका संशोधनानुसार च्युईंगमचे फायदे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेत.च्युईंगम चघळल्याने बुद्धी तल्लख बनते आणि स्मरणशक्ती वाढत असल्याचंही समोर आलंय. च्युईंगम चघळताना कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याची क्षमता दहा टक्क्यांनी वाढते असंही या संशोधनातून पुढे आलंय. इतकंच नाही तर च्युईंगम चघळण्याच्या प्रक्रियेदरम्यान मेंदूचे कमीत कमी आठ भाग कार्यान्वित होतात. मेंदूतील रक्ताभिसरण प्रक्रिया वेगाने वाढते ही बाबसुद्धा जपानी संशोधकांच्या अभ्यासातून उघड झालीय. याशिवाय ऍसिडिटीच्या समस्येतूनही च्युईंगमुळे सुटका होते. पचनक्रिया सुधारण्यातही च्युईंगमचा फायदा होतो.
 
च्युईंगम चघळतानाचे आरोग्यदृष्टया फायदे
च्युईंगम चघळणं ओरल हेल्थसाठीही उपयोगी असतं. दात आणि जबड्याच्या व्यायामासाठीही ते फायदेशीर ठरु शकते मात्र कोणत्या प्रकारचे च्युईंगम चघळता यावर ते अवलंबून असतं. शुगर फ्री च्युईंगम चघळत असाल तर तोंडात उत्तेजक स्वरुपाची लाळ तयार होते. यामुळं नवी स्फूर्ती मिळते. या लाळेत काही खनिजंही निर्माण होत असल्याने दातांच्या उत्तम आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरतात.
 
च्युईंगम अतिसेवनाचे  तोटे 
च्युईंगमचे जितके फायदे तितकेच त्याचे तोटेसुद्धा आहेत.त्यामुळं च्युईंगचे अतिसेवनसुद्धा आरोग्याला घातक ठरू शकतं. च्युईंगमच्या अतिसेवनानं दातांना धोका निर्माण होऊ शकतो. साखरयुक्त च्युईंगम चघळल्याने दात दुखण्यासारख्या समस्या वाढू लागतात. ऍसिड आणि फ्लेवरवाल्या च्युईंगममुळे दातांना धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नाही तर च्युईंगम चघळता चघळता ते चुकून पोटात जाण्याचीही भीती असते. यामुळं पाचनप्रक्रियेला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय यामुळं पोटाचे विकार जडण्याचीही शक्यता असते. त्यामुळं च्युईंगम चघळताना त्याचे फायदे तोटे याचा विचार करुनच त्याचे सेवन करा. 

Web Title: Chewingam accountable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.