मलेरियासारख्या आजारांना दूर ठेवते कोंबडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2016 01:28 PM2016-09-10T13:28:33+5:302016-09-10T18:58:33+5:30

कोंबडी डासांनाही दूर ठेवते असे एका संशोधनात समोर आले आहे

Chickens Keeping Malaria-like Diseases | मलेरियासारख्या आजारांना दूर ठेवते कोंबडी

मलेरियासारख्या आजारांना दूर ठेवते कोंबडी

Next

/>कोंबडी ही केवळ अंडी देते, कदाचित एवढेच आपल्याला माहिती असेल. परंतु डासांनाही त्या दूर ठेवतात, असे एका संशोधनात समोर आले आहे. डासांना दूर ठेवल्याने डासांपासून उद्भवणारे मलेरियासारखे आजारही आपोआप दूर राहतात. त्यामुळे अशा आजारांना रोखण्यासाठी कोंबडी उपयुक्त आहे. त्यांच्यातून निघणाºया गंधामुळे डास हे दूर राहतात. स्विडिश युनिव्हर्सिटी आॅफ अ‍ॅग्रीकल्चर सायन्स व इथोपियाच्या अदीस अबाबा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास पूर्ण केला आहे. अनेकांना वाटत असेल की, डासांना केवळ रक्त हवे असते; पण त्यांनाही चांगल्या व खराब रक्तामधील फरक कळून येतो. २०१५ मध्ये डास चावल्यामुळे २१४ मिलियन जणांना विविध प्रकारचे आजार झाले होते. त्यामधून जवळपास ४ लाख ३८ हजार जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकारामुळे प्रत्येक वर्षी मलेरियामुळे लाखो जणांचा मृत्यू होतो, अशा आजारांना रोखण्यासाठी कोंबडी पाळणे उपयुक्त आहे.

Web Title: Chickens Keeping Malaria-like Diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.