आता चॉकलेट वाढवेल तुमच्या पायांचं सौंदर्य; घरीच करा चॉकलेट पेडिक्योर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 03:32 PM2019-02-11T15:32:18+5:302019-02-11T15:39:43+5:30
दिवसभर धावपळ केल्यामुळे शरीरासोबतच तुमचे पायही थकतात. अशातच पायांचा थकवा दूर करून, त्वचा कोमल आणि मुलायम करण्यासाठी खास काळजी घेणं आवश्यक आहे. अशातच तुम्ही घरातच पायांची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय करू शकता.
दिवसभर धावपळ केल्यामुळे शरीरासोबतच तुमचे पायही थकतात. अशातच पायांचा थकवा दूर करून, त्वचा कोमल आणि मुलायम करण्यासाठी खास काळजी घेणं आवश्यक आहे. अशातच तुम्ही घरातच पायांची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय करू शकता. पायंची स्वच्छता राखणं, मसाज करणं आणि पेडिक्योर करू शकता. पेडिक्योर करताना जेव्हा तुम्ही कोमट पाण्यामध्ये पाय ठेवून बसता. त्यावेळी तुम्हाला आराम मिळतो. अशातच गरज असेल तर चॉकलेट पेडिक्योर करू शकता. चॉकलेट पेडिक्योरमध्ये चॉकलेट वितळवून त्याचा वापर करण्यात येतो. हे पायांमधील ब्लड सर्क्युलेशन ठिक करण्यासाठी मदत करतं. यामुळे त्वचा मॉयश्चराइझ होण्यास मदत होते. चॉकलेट पेडिक्योर तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता. जाणून घेऊया चॉकलेट पेडिक्योर तयार करण्याची पद्धत...
घरच्या घरी चॉकलेट पेडिक्योर करण्यासाठी आवश्यक साहित्य :
- 4 ½ कप वितळवलेलं चॉकलेट
- 2 कप दूध
- 2 चमचे मध
- एका टबमध्ये गरम पाणी
- फूट स्क्रब
- नेल फायलर
- नेल स्क्रब
- नेल कटर
- नेल पेंट
- नेल पेंट रिमूव्हर
- मॉइश्चरायझर
- टॉवेल
पेडिक्योर करण्याची पद्धत :
- सर्वात आधी नखांवर लावलेली नेट पेंट काढून टाका.
- आता एका बादलीमध्ये कोमट पाणी घ्या, त्यामध्ये पाय सोडून बसा. या पाण्यामध्ये थोडसं सैंधव मीठ टाकू शकता. पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी पाय सोडून बसा.
- त्यानंतर वितळलेल्या चॉकलेटमध्ये दूध मिक्स करून पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये पाय टाकून आराम करा. पायांना या पेस्टमुळे कमीत कमी 20 मिनिटांपर्यंत ठेवा. त्यानंतर पाय धुवून घ्या.
- पाय धुतल्यानंतर स्क्रब करा. स्क्रब केल्याने त्वचेवर मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते.
- यासाठी तुम्ही घरीच चॉकलेट स्क्रब तयार करू शकता. 5 ते 10 मिनिटांपर्यत पायांना स्क्रब करा. स्क्रबिंग केल्यानंतर पायांना थंड पाण्याने किंवा वेट टिश्यूने स्वच्छ करून टाका.
- सर्वात शेवटी मॉयश्चरायझर लावून 2 मिनिटांपर्यंत मसाज करा, यामुळे त्वचेला पोषम मिळतं. त्यानंतर नखांवर तुमच्या आवडीची एखादी नेलपेंट लावा.
चॉकलेट पेडिक्योरचे फायदे :
पायांचे सौंदर्य राखण्यासाठी चॉकलेट पेडिक्योर फायदेशीर आहे. यामुळे अनेक फायदेही होतात. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासोबतच, मृत पेशी काढून टाकण्यासाठीही मदत करतं.