तुमच्या स्किन टाइपनुसार निवडा सीरम; जाणून घ्या सीरमचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 03:10 PM2018-10-15T15:10:56+5:302018-10-15T15:12:36+5:30

आपल्या चेहऱ्याची त्वचा शरीराच्या बाकी अवयवांच्या त्वचेपेक्षा संवेदनशील असते. त्यामुळे त्याची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. हेल्दी त्वचेसाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉयश्चरायझिंग नियमितपणे करणं गरजेचं आहे.

choose serum according to your skin type | तुमच्या स्किन टाइपनुसार निवडा सीरम; जाणून घ्या सीरमचे फायदे!

तुमच्या स्किन टाइपनुसार निवडा सीरम; जाणून घ्या सीरमचे फायदे!

Next

आपल्या चेहऱ्याची त्वचा शरीराच्या बाकी अवयवांच्या त्वचेपेक्षा संवेदनशील असते. त्यामुळे त्याची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. हेल्दी त्वचेसाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉयश्चरायझिंग नियमितपणे करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या रूटीनमध्ये सीरमचासुद्धा समावेश करणं फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला वाटत असेल की, त्वचेसाठी सीरमची गरज नाही तर आधी त्याचे फायदे जाणून घ्या.

फेस सीरम हे लिक्विड स्वरूपात असते त्यामुळे ते चेहऱ्यावर लावल्याने त्वचेमध्ये लगेच शोषले जाते. याचा नियमित वापर केल्यास काही दिवसातच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये बदल जाणवू लागतील. तुम्ही याचा वापर मॉयश्चरायझर लावण्याआधी करू शकता. साधारणतः सीरम इसेंशिअल ऑइलपासून तयार होतं. जे त्वचेला आतून हायड्रेट करण्यास मदत करतं. नियमितपणे सीरमचा वापर केल्याने त्वचेवरील डाग निघून जातील आणि त्वचा हायड्रेट होण्यास मदत होईल. 

सीरमचे फायदे - 
 
- सीरमचा वापर केल्याने त्वचा हायड्रेट होते आणि तजेलदार दिसते. 

- सीरम क्रिमसारखे चिकट नसतात आणि त्वचेची रोमछिद्रांतील घाण स्वच्छ करतात. 

- फाउंडेशन लावण्यासाठी हे बेस तयार करतात. 

- सीरम्स त्वचेमध्ये सहज प्रवेश करून क्रिमपेक्षा चांगला रिझल्ट देतात. 

बाजारामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कंपनींच्या सीरम्समधून योग्य त्याची निवड करणं अनेकदा फार कठीण ठरतं. तुम्ही तुमच्या स्किन टाइपनुसार योग्य सीरमची निवड करू शकता. सीरमची निवड करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. सर्वात आधी तुमच्या त्वचेच्या समस्या जाणून घ्या. त्यानंतर स्किन टाइपनुसार योग्य ते सीरम निवडा. 
 
ऑयली स्किन

जर तुमची स्किन ऑयली आणि संवेदनशील असेल तर सॅलिसिलिक अॅसिड आणि रेटिनॉल असलेला फेस सीरम निवडा. 

ड्राय स्किन 

ड्राय स्किनसाठी हायल्युरॉनिक अॅसिड आणि व्हिटॅमिन-सी असलेलं सीरम फायदेशीर ठरेल. व्हिटॅमिन-सीची मात्रा अधिक असलेले सीरम प्रदुषणापासून लढण्यासाठी त्वचेची मदत करतील. व्हिटॅमिन-सी त्वचेवरील घाण काढून टाकण्यासाठी मदत करतात. 

नॉर्मल स्किन

नॉर्मल स्किन टाइपसाठी ग्लायकॉलिक अॅसिड असलेल्या सीरममुळे चांगले फायदे मिळतात. हे स्किन तजेलदार आणि तरूण बनवण्यासाठी फायदेशीर ठरते. ग्लायकॉलिक सीरम त्वचेला एक्सफॉलिट करतं आणि त्वचा तजेलदार दिसण्यास मदत करतं. 

Web Title: choose serum according to your skin type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.