परफ्यूम निवडताना...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2016 05:25 PM2016-11-11T17:25:50+5:302016-11-11T17:34:43+5:30
आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडावी असे प्रत्येकाला वाटते. विशेष म्हणजे विविध कार्यक्रमाप्रसंगी ही काळजी घेतली जाते. याप्रसंगी आकर्षक वेशभूषेबरोबरच परफ्यूमलाही तेवढेच महत्त्वाचे स्थान आहे. आज आपण कोणत्या कार्यक्रमांना कोणते परफ्यूम वापरावे याबाबत जाणून घेऊया...
Next
आ ल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडावी असे प्रत्येकाला वाटते. विशेष म्हणजे विविध कार्यक्रमाप्रसंगी ही काळजी घेतली जाते. याप्रसंगी आकर्षक वेशभूषेबरोबरच परफ्यूमलाही तेवढेच महत्त्वाचे स्थान आहे. आज आपण कोणत्या कार्यक्रमांना कोणते परफ्यूम वापरावे याबाबत जाणून घेऊया...
वाढदिवस
वाढदिवस म्हटले म्हणजे आनंदाचा क्षण. यावेळी आपण आकर्षक व फॅशनेबल वेशभूषा करतोच. याप्रसंगी गुलाब किंवा ट्युलिपसारख्या फुलांचे मिश्रण असलेला परफ्यूम वापरल्यास आपल्या व्यक्तिमत्त्वाची नवीन ओळख निर्माण होईल.
विवाह सोहळा
विवाह सोहळा हा दिवस एक अविस्मरणीय क्षण असतो. या दिवसाची तुम्हाला सातत्याने विशेष आठवण राहावी म्हणून गुलाब, शेवंती आणि जाई यांचे मिश्रण असलेला सुगंध हा प्रेमळ आभास निर्माण करतो. हलक्या फुलांचा सुगंधदेखील वापरता येईल. यामुळे ताजेपणाचा अनुभव मिळेल.
ख्रिसमस
ख्रिसमसप्रसंगी चंदन आणि देवदारपासून तयार करण्यात आलेल्या अत्तराचा वापर करता येईल. अशा प्रकारचा सुगंध हा ताजेपणाचा आभास देतो.
नवीन वर्ष
नववर्षाच्या शुभारंभप्रसंगी सर्वांच्याच आनंदाला ऊधाण आलेले असते. अशावेळी मस्ती, बोल्डनेसचा आभास करुन देणारा लिंबूवर्गीय सुगंधाचा परफ्यूम आकर्षक ठरतो. थोडासा गुढ, आतमध्ये मुरणारा सुगंध आनंद देणारा असतो. हाच सुगंध तुमची आवडत्या व्यक्तींसोबतही शेअर करा. अशाप्रकारे तुमचे कपाट विविध सुगंधांच्या विविध परफ्यूमने सजवा.