निरोगी आरोग्यासाठी शहर नियोजनही महत्वाचे !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2016 03:31 PM2016-09-29T15:31:42+5:302016-09-29T21:01:42+5:30
शहराचे नियोजन हे चांगल्याप्रकारे केलेले असेल तर आजाराचे प्रमाण हे कमी असते
Next
त्यासाठी बाजारपेठ, शाळा - महाविद्यालये, नोकरी व व्यवसायाचे ठिकाणे हे पायी चालत पोहोचता येतील या अंतरावर असावी. ही व्यवस्था पायी चालण्याच्या अंतरावर असली तर त्यामुळे वाहने वापरण्याची गरज पडणार नाही. त्याचा फायदा नागरिकांचे पायी चालल्याने व्यायाम होतो व त्याचबरोबर अपघाताचाही धोका राहत नाही. तसेच प्रदूषणाचाही धोका टाळता येतो. असे विविध प्रकारचे फायदे हे शहर नियोजनाचे आहेत. हे संशोधन प्रत्यक्षात येण्यासाठी सर्वाचा सहभाग यामध्ये महत्त्वाचा आहे.