CNX STYLE GUIDE : ​हिवाळ्यात असे राहा ‘स्टायलिश’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2016 05:01 PM2016-10-25T17:01:32+5:302016-10-25T17:01:32+5:30

हिवाळ्यात स्टायलिश राहणीमान करायचे असेल तर पुढील पाच गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणे अत्यावश्यक आहे.

CNX STYLE GUIDE: Be the 'Stylish' in the Winter | CNX STYLE GUIDE : ​हिवाळ्यात असे राहा ‘स्टायलिश’

CNX STYLE GUIDE : ​हिवाळ्यात असे राहा ‘स्टायलिश’

googlenewsNext
वाळीची खरेदी धुमधडाक्यात सुरू असेल ना? सणोत्सवोच्या काळात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. खासकरून बाजारपेठेत तर बहर आलेली असते.  पुढच्या दोन-तीन महिन्यांचा विचार करूनच  दिवाळीचे कपडे घेतानाशॉपिंग करणे स्मार्टपणा ठरतो.

तरुणांचे आॅल टाईम फेव्हरेट टी-शर्टस्  हिवाळ्यात वापरणं थोडसं अवघड असते. फॉमर्ल लूक असो वा कॅज्युअल, विंटर फॅशन करताना कम्फर्टेबिलिटीचा विचार करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे हिवाळ्यात स्टायलिश राहणीमान करायचे असेल तर पुढील पाच गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणे अत्यावश्यक आहे.

१. वूल ब्लेझर

                                                                  Blazer


हिवाळ्यात सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते म्हणजे चांगल्या क्वालिटीचे वूल ब्लेझर. तुमचा शर्ट किंवा पँट कोणतेही असू द्या, शेवटच्या मिनिटाला मॉडर्न आणि अल्ट्रा स्टायलिश लूक देण्याचे काम ब्लेझर करत असते. खास करून नेव्ही ब्लू रंगाचे वूल ब्लेझर अगदी कोणत्याही ड्रेसवर एकदम चपखल बसते. शिवाय थंडीमध्ये छान गरम वाटेल.
  
२. डार्क रंगाचे बटन डाऊन शर्टस्

हिवाळ्यात गडद रंगाचे कपडे वापरण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नोकरी करत असाल, पूर्ण बाह्यांचा छान बटन-डाऊन शर्ट तुमच्यासाठी अगदी योग्य पर्याय आहे. परफेक्ट लूकचा तो मुलभूत भाग आहे. त्यामध्ये निळ्या रंगाच्या शेडस्मुळे आपोआप एक प्रकारचा मॉडर्न लूक येतो. प्रोफेशनल दिसण्याबरोबरच शार्प आणि स्लिम लूकमुळे आऊटिंगलासुद्धा तो कामी येतो.

                              Shirt and Pant

३. काळी जीन्स

सध्या चिनोज्ची खूप चलती आहे. त्यामुळे इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक मॅच्युअर दिसण्यासाठी यंदाच्या हिवाळ्यात तुमच्याकडे किमान एक तरी काळ्या रंगाची वेल-फिटिंग जीन्स असायलाच हवी. जीन्समुळे खूपच कॅज्युअल लूक दिसेल याची चिंता वाटत असेल तर वर सांगितल्याप्रमाणे बटण-डाऊन शर्टवर ब्लेझर चढवले की छान प्रोफेशनल ड्रेस बनतो. विकेंडला या जीन्सवर साधा शर्ट घातला जाऊ शकतो.

४. काळे स्नीकर्स

                                                                           Sneakers


विकें डच्या कॅज्युल लूकसाठी काळ्या रंगाच्या स्नीकर्सपेक्षा जास्त चांगली गोष्ट असूच शकत नाही. स्नीकर्समुळे तुम्ही खूपच केअरफ्री किंवा खूपच फॉर्मल दिसत नाही. परंतु एकदम परफेक्ट लूकसाठी कमीतकमी डिझाईन असाणारे स्नीकर्स वापरावेत. डार्क जीन्सवर ते अतिशय उठून दिसतात. सर्वांपेक्षा हटके दिसण्यासाठी स्नीकर्सचा एक जोड तरी कलेक्शनमध्ये असावा.

५. लोफर्स

                                                                             Loafers


आॅफिसकरिता फॉर्मल शूजला सर्वोत्तम पर्याय म्हणजे लोफर्स. संपूर्ण आठवडा तुम्ही काळे आणि तपकिरी रंगाचे लोफर्स आलटून-पालटून वापरू शकता. त्यांची खासियत म्हणजे तुमचा आॅफिशियल ड्रेस कसाही असू द्या, सर्व कपड्यांवर ते मॅच होतात. जीन्सवरसुद्धा ते चपखल बसतात. हिवाळ्यात पायांना थंडीपासून वाचविण्यासाठी तर लोफर्स खूप परिणामकारक असतात. शिवाय तुम्हाला जर सवय असेल तर सॉक्स न घालताही लोफर्स वापरले जाऊ शकतात. नाही तर गडद रंगाचे वूल सॉक्स पायांना खूप आरामदायक ठरतील.

Web Title: CNX STYLE GUIDE: Be the 'Stylish' in the Winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.