चेहऱ्यावरील डाग लगेच दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 12:28 PM2018-11-26T12:28:16+5:302018-11-26T12:33:52+5:30

नारळाचं पाणी हे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र याने केवळ आरोग्यच नाही तर आपलं सौंदर्य वाढवण्यासाठीही मदत मिळते.

Coconut water is beneficial to remove facial irritation immediately! | चेहऱ्यावरील डाग लगेच दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर!

चेहऱ्यावरील डाग लगेच दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर!

Next

(Image Credit : makeupandbeauty.com)

नारळाचं पाणी हे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र याने केवळ आरोग्यच नाही तर आपलं सौंदर्य वाढवण्यासाठीही मदत मिळते. नारळाच्या पाण्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. याने त्वचेला वेगवेगळे फायदे होतात. चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फार फायदेशीर ठरतं. तसेच त्वचा मुलायम होण्यासही मदत होते. 

चेहरा उजळवण्यासाठी फायदेशीर

(Image Credit : makeupandbeauty.com)

नारळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर एक तजेलदारपणा येतो. नारळाल्या पाण्यात अँटी-ऑक्सिडेंट्स आणि मिनरल्स असतात. जे त्वचेच्या मुळात जाऊन त्वचेला पोषण देतात. तसेच नारळाच्या पाण्याक व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, मॅग्नीज, पोटॅशिअम, सोडियम आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे याने त्वचेची चांगल्याप्रकारे टोनिंग केली जाते. आणि नैसर्गिक रंग मिळतो. 

डाग होतात दूर

(Image Credit : www.adorebeauty.com.au)

नारळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी २ ते ३ वेळा नारळाचं पाणी चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर नारळाच्या पाण्याने चेहऱ्याची मसाज करा. नंतर साध्या पाण्याचे चेहरा स्वच्छ करा. याने त्वचेवरील डाग तर दूर होतीलच सोबतच त्वचेवरील सुरकुत्या दूर होतील. 

पिंपल्सची समस्या होईल दूर

(Image Credit : www.medicalnewstoday.com)

हार्मोन्समधीस बदल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे पिंपल्स येतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांना ही पिंपल्सची समस्या अधिक होते. अशात नारळाच्या पाण्याचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर चेहरा नारळाच्या पाण्याने स्वच्छ करावा. याने हळूहळू पिंपल्स दूर होतील आणि चेहऱ्यावर डागही राहणार नाहीत. 

टॅनिंगची समस्या करा दूर

(Image Credit : beautyhealthtips.in)

हिवाळ्यात असो वा उन्हाळ्यात जास्त उन्हामुळे त्वचेवर टॅनिंगची समस्या होते. टॅनिंग आणि सूर्यकिरणांमुळे त्वचेला होणारी समस्याही दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर ठरतं. जर जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचा काळपट पडली असेल किंवा त्वचेची जळजळ होत असेल कापसाच्या मदतीने नारळाचं पाणी त्वचेवर लावा. दररोज दिवसातून दोनदा नारळाचं पाणी त्वचेवर लावल्याने त्वचा स्वच्छ होईल.  

Web Title: Coconut water is beneficial to remove facial irritation immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.