कॉफीलाही लिमिट असावे...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2016 08:42 AM2016-08-16T08:42:26+5:302016-08-16T14:12:26+5:30
कॉफी हे एकप्रकारचे व्यसन असते असेच म्हटले जाते. चहाची तलब आल्यावर चहा प्यायल्याशिवाय समाधान मिळत नाही. त्याचप्रमाणे कॉफीचे व्यसन असते. कॉफीची आठवण आली की, कॉफी कधी पितो असे होते. चहा-कॉफी ही दोन्ही पेये परदेशातून आली. शंभर एक वर्षांपूर्वी कॉफी पिणे अथवा चहा पिणे हे एक स्टेटस सिम्बॉल मानले जात असे. पण आता प्रत्येकाचीच दिवसाची सुरुवात ही चहा अथवा कॉफीने होते. त्यातही कॉफी पिणे हे आजही चहापेक्षा अधिक प्रतिष्ठेचे मानले जाते.
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">कॉफी हे एकप्रकारचे व्यसन असते असेच म्हटले जाते. चहाची तलब आल्यावर चहा प्यायल्याशिवाय समाधान मिळत नाही. त्याचप्रमाणे कॉफीचे व्यसन असते. कॉफीची आठवण आली की, कॉफी कधी पितो असे होते. चहा-कॉफी ही दोन्ही पेये परदेशातून आली. शंभर एक वर्षांपूर्वी कॉफी पिणे अथवा चहा पिणे हे एक स्टेटस सिम्बॉल मानले जात असे. पण आता प्रत्येकाचीच दिवसाची सुरुवात ही चहा अथवा कॉफीने होते. त्यातही कॉफी पिणे हे आजही चहापेक्षा अधिक प्रतिष्ठेचे मानले जाते.
सकाळी कॉफी प्यायल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही अशी अनेकांचे म्हणणे असते. कॉफीचा घोट घेतल्या घेतल्या झोप लगेचच उडून जाते, एक प्रकारचा वेगळा तजेला मनाला मिळतो. कॉफी केवळ भारतातीलच नव्हे तर अनेक देशांतील लोकांचे आवडते पेय मानले जाते. या कॉफीचा स्वाद तर चांगला असतो पण त्याचसोबत कॉफीचा वासही अनेकांना आवडतो. कॉफीच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत, त्या सर्वांमध्ये नेस कॉफी ही सर्वात उत्तम आहे, असे समजले जाते. काही जणांना तर कॉफीची इतकी सवय असते की, दिवसात नकळत ते चार-पाच कप कॉफी तरी पितात. कॉफीमध्ये असलेले कॉफिन हे शरीरास अपायकारक असल्याने कॉफीचे अधिक सेवन केल्यास ते शरीरास घातक ठरते. कॉफी पिण्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. कोणतीही गोष्ट प्रमाणात केली तर तिचा त्रास होत नाही. पण कॉफीचे व्यसनच तुम्हाला लागले आणि नकळत 8-10 कप तुम्ही दिवसाला प्यायला लागलात तर ते तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक आहे. जास्त कॉफी प्यायल्याने मळमळणे, डोके दुखणे, भूक मंदावणे, रक्तदाब कमी होणे अथवा जास्त होणे, स्मरणशक्तीवर परिणाम होणे, डोके दुखणे, थकणे यांसारखे दृष्परिणाम होऊ शकतात. पण त्याच तुलनेत कॉफी प्रमाणात प्यायली तर तुमची स्मरणशक्ती अधिक चांगली होऊ शकते असे अनेक अभ्यांसामधून सिद्ध झाले आहे. सगळ्या कॉफींमध्ये ब्लॅक कॉफी ही आरोग्यासाठी अधिक चांगली असते. ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीज कमी असल्याने त्यामुळे वजन वाढत नाही तसेच यात कॅल्शियम आणि पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असल्याने ती शरीरासाठी चांगली असते. ब्लॅक कॉफी पिताना साखर न घातल्यास ती शरीरासाठी अधिक चांगली असते. ब्लॅक कॉफीमुळे पोट साफ राहाण्यासही मदत होते. तसेच वजन कमी होते. लंडनमध्ये काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनात सिद्ध झाले आहे की, दिवसातून तीन-चार कप कॉफी पिणाऱ्या लोकांना हृदयरोगाचा धोका कमी असतो. तसेच मधुमेह होण्याचे प्रमाणही कॉफी पिणाऱ्यांमध्ये कमी असते.
महिलांनी गर्भावस्थेत कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे. गर्भावस्थेत चहा आणि कॉफी या दोन्ही गोष्टींपासून दूर राहाणेच चांगले. गर्भवती स्त्रीने कॉफीचे सेवत जास्त केल्यास तिच्या पचनसंस्थेचे काम मंदावू शकते. तसेच चिडचिड होणे, डोके दुखणे यांसारख्या गोष्टीही कॉफी प्यायल्याने होऊ शकतात.
कॉफी दुपारी चार वाजल्यानंतर पिणे टाळावी. कॉफी सकाळच्या वेळात प्यायलेली कधीही चांगली. कॉफी प्रमाणात प्यायली गेली तर ती तुमच्या शरीरासाठी चांगली अाहे. त्यामुळे कॉफी पिताना ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा.