दररोज आंघोळ करण्याचे आहेत हे दुष्परिणाम, अभ्यासातून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 10:14 AM2018-05-03T10:14:00+5:302018-05-03T10:14:00+5:30
असेही काही लोक आहेत ज्यांना दररोज आंघोळ करणं म्हणजे कंटाळवाणं वाटतं. तर, अनेकांना वाटतं की दररोज आंघोळ केल्याने आजारांपासून मुक्ती मिळते.
मुंबई : दररोज आंघोळ करणं हे प्रत्येकासाठीच दिवसातील एक महत्वपूर्ण काम आहे. मात्र, असेही काही लोक आहेत ज्यांना दररोज आंघोळ करणं म्हणजे कंटाळवाणं वाटतं. तर, अनेकांना वाटतं की दररोज आंघोळ केल्याने आजारांपासून मुक्ती मिळते. फ्रेश आणि स्वच्छ वाटतं. घामाने चिकट झालेलं शरिर स्वच्छ होतं. पण एका अभ्यासात एक अनोखा खुलासा करण्यात आलाय.
एका अभ्यासातून दररोज आंघोळ करणे म्हणजे विविध आजारांना निमंत्रण देणे, असा धक्कादायक निष्कर्ष समोर आेह. त्वचेवरील तेलकट थर दररोज आंघोळ केल्याने नाहीसा होतो आणि त्यामुळे त्वचेचे आजार बळावतात, असेही त्यात सांगण्यात आले आहे.
दररोज आंघोळ करणं वाईट
तुम्हाला माहिती असेलच की आपल्या शरिरावर ऑईलचा एक थर असतो. तसेच अनेकदा तुम्हाला अनुभव आला असेल की, २ ते ३ दिवस हेअर वॉश केलं नाही तर केसांवर तेल जमा होतं. मात्र, एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, दररोज आंघोळ केल्याने त्वचेवरील तेलकट थर नाहीसा होतो आणि त्यामुळे त्वचेचे आजार उद्भवतात.
त्वचेवर परिणाम
ज्यावेळी तुम्ही दररोज आंघोळ करता त्यावेळी तुम्ही केमिकलयुक्त साबनाचा वापर करता आणि त्यामुळे तुमच्या स्कीनवरील पीएच लेवल कमी होत जातो. यामुळे तुमची त्वचा फाटते आणि जास्त कोरडी होते.
स्कीनची आधीच समस्या असेल तर...
जर तुम्हाला सुरुवातीपासूनच त्वचेचा आजारा जाणवत असेल किंवा जर तुम्हाला स्कीनची एलर्जी जाणवत असेल तर दररोज आंघोळ केल्याने त्वचा आणखीन खराब होते.
चांगले बॅक्टेरिया होतात नष्ट
तुम्हाला ऐकून थोड विचित्र वाटेल मात्र हे खरं आहे. त्वचेत असलेले चांगले बॅक्टेरिया वाईट बॅक्टेरियांसोबत लढण्यासाठी स्वत: अँटीबॉडी तयार करतात. मात्र, दररोज आंघोळ केल्याने महत्वपूर्ण बॅक्टेरिया नष्ट होतात.
त्वचेला जास्त घासू नका
आंघोळ करत असताना त्वचेला जास्त घासल्याने शरिरासाठी अपायकारक होऊ शकते. जास्त घासल्यामुळे तुमची स्कीन लवकर खराब होते. तसेच अंगावरील केस निघून जातात.