केसगळतीची समस्या वाढलीये? खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून लावा 'या' दोन गोष्टी, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 03:56 PM2024-10-25T15:56:09+5:302024-10-25T16:43:50+5:30
Hair Care : हिवाळ्यातही केसगळतीची समस्या वाढते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्याचा एक नॅचरल घरगुती उपाय सांगणार आहोत.
Hair Care : आजकाल जास्तीत जास्त लोक केसगळतीच्या समस्येने हैराण झालेले असतात. कमी वयात केसगळती म्हणजे फार त्रासदायक. अशात लोक वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करून केसगळती थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण केमिकल्सने केसगळती थांबण्याऐवजी आणखी वाढते. हिवाळ्यातही केसगळतीची समस्या वाढते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्याचा एक नॅचरल घरगुती उपाय सांगणार आहोत. तुम्हाला यासाठी खोबऱ्याच्या तेलात फक्त दोन गोष्टी मिक्स करायच्या आहेत.
कढीपत्ता आणि खोबऱ्याचं तेल
महिला असो वा पुरूष केसगळती थांबवण्यासाठी तुम्ही कढीपत्ता आणि खोबऱ्याच्या तेलाचं मिश्रण तयार करू शकता. कढीपत्त्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, प्रोटीन आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स असतात. डोक्याच्या त्वचेला या गोष्टी पोषण देण्याचं काम करतात. तसेच कढीपत्त्यामध्ये आयर्न, कॅल्शिअम आणि फॉस्फोरसही असतं. जे केसांच्या एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
कसं तयार कराल मिश्रण?
कढीपत्ते, खोबऱ्याचं तेल आणि मेथीच्या दाण्यांनी हे मिश्रण तयार करता येईल. यासाठी एका खोबऱ्याच्या तेलात एक चमचा मेथी दाणे आणि मुठभर कढीपत्ते टाका. हे तेल गरम करा. थंड झाल्यावर हे तेल केसांना आणि केसांच्या मुळात लावा. काही वेळ केसांची मालिश करा. 1 तास हे तेल केसांना असंच राहू द्या. त्यानंतर शाम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करू शकता.
कढीपत्त्याचा हेअर मास्क
केसांना कढीपत्त्यांचा हेअर माक्स करूनही लावू शकता. हेअर मास्क बनवण्यासाठी मुठभर कढीपत्ते बारीक करा. यात दोन ते तीन चमचे दही मिक्स करा. हा तयार मास्क केसांवर अर्धा तास लावू ठेवा, त्यानंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क केसांवर लावू शकता. याने केसगळती कमी होईल, केस चमकदार आणि मुलायमही होतील.
खोबऱ्याचं तेल आणि लिंबाचा रस
पांढरे केस काळे करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करा आणि केसांच्या मुळात लावा. केसांच्या मुळात या तेलाने चांगली मालिश करा. लिंबाच्या रसात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे ऑक्सिडेटिव स्ट्रेस दूर करण्यास मदत करतात. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा वापरा. हे मिश्रण तयार करण्यासाठी एका वाटीत खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. साधारण 1 तासानंतर हे तेल केसांच्या मुळात लावा, चांगली मालिश करा. काही दिवस ही क्रिया केल्यावर लवकरच पांढरे केस काळे होऊ लागतील.