तुम्हीही त्वचेबाबत 'या' चुका करता का?; असं पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 11:33 AM2019-07-05T11:33:40+5:302019-07-05T11:36:26+5:30
जवळपास सर्वच तरूणी आणि महिला आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी शक्य असतील ते सर्व उपाय आणि काळजी घेत असतात. त्यासाठी अनेकदा त्या बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्ससोबतच घरगुती उपायांचाही आधार घेत असतात.
जवळपास सर्वच तरूणी आणि महिला आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी शक्य असतील ते सर्व उपाय आणि काळजी घेत असतात. त्यासाठी अनेकदा त्या बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्ससोबतच घरगुती उपायांचाही आधार घेत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? हे सर्व उपाय तेव्हाच फायदेशीर ठरतील, जेव्हा तुमचं डेली स्किन केयर रूटीन योग्य असेल. आज आम्ही तुम्हाला काही साधारण चुकांबाबत सांगणार आहोत. ज्या तुम्ही तुमच्या दररोजच्या स्किन केअर रूटिनमध्ये करता. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
(Image Credit :askdoctork.com)
मानेवर लक्ष न देणं
तुमच्या चेहऱ्या एवढचं महत्त्व आपल्या मानेलाही देणं आवश्यक असतं. चेहऱ्याच्या त्वचेएवढीचं त्याची मानही नाजूक असते. अशातच चेहऱ्यासोबतच मानेवरही फोकस करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही फेसवॉश, क्लीनिंग, मॉयश्चरायझिंग आणि एक्सफोलिएशन करत असाल त्यावेळी ते फक्त चेहऱ्यापुरतचं न करता तुमच्या मानेपर्यंत म्हणजेच, कॉलर बोनपर्यंत करा.
अप्पर लिपकडे दुर्लक्षं करू नका
जर तुम्ही आयब्रोप्रमाणेच अप्पर लिप्सचीही थ्रेडिंग करत असाल तरिही आणि नसाल करत तरिही तुम्हाला तुमच्या अप्पर लिप्सची काळजी घेणं आवश्यक आहे. चेहऱ्याच्या या भागालाही मॉयश्चरायझेशनची गरज असते. चेहऱ्याच्या या भागावरील कोलेजन फार लवकर संपून जातं. त्यामुळे अशावेळ अशा एखाद्या क्रिमचा वापर करा, ज्यामध्ये कोलाजन बूस्टिंग पावर जास्त असेल.
प्रत्येक दिवशी सनस्क्रिन यूज न करणं
अनेकदा बाहेर पडताना 'आजचं वातावरणं चांगलं आहे, ऊन नाही' हा विचार करून आपण सनस्क्रिन लावणं टाळतो. पण असं अजिबात करू नका. अनेक महिलांचा तर असा समज असतो की, सनस्क्रिनची गरज फक्त उन्हाळ्यातच असते. पण हा समज अत्यंत चुकीचा आहे. वातावरण कसंही असो, जेव्हाही तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल त्यावेळी सनस्क्रिन लावा. यामुळे सन टॅनिंगसोबतच त्वचेशी निगडीत आजार होण्याचा धोकाही कमी होतो.
जास्त फेस येणारा फेसवॉश किंवा साबण वापरणं
जास्त फेस येणारे फेसवॉशमुळे रिफ्रेशिंग वाटत असलं तरिही हे खरं आहे की, यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असतो. जे त्वचेसाठी नुकसानदायी असतात. त्यामुळे असे साबण आणि फेसवॉशचा वापर करणं शक्यतो टाळा.
त्वचेवर चुकीच्या पद्धतीने लेयरिंग
अनेक महिलांना ब्युटी प्रोडक्ट्सचा योग्य वापर करण्याबाबत माहीत नसतं. अनेकदा त्या चेहऱ्यावर ब्युटी प्रोडक्ट्सचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. त्वचेवर ते सर्वात आधी लाइटवेट फॉर्म्युला वापरा आणि त्यानंतरच हेव्ही फॉर्म्युला अप्लाय करा. त्यामुळे स्किन सर्व प्रोडक्ट्स व्यवस्थित अब्जॉर्ब करू शकेल.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.