​लहान मुलांचे घोरणे शिक्षणासाठी धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2016 02:28 PM2016-05-18T14:28:28+5:302016-05-18T19:58:28+5:30

रात्री मुलं जर घोरत असतील तर त्याचा त्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होते.

Dangerous to children's education | ​लहान मुलांचे घोरणे शिक्षणासाठी धोकादायक

​लहान मुलांचे घोरणे शिक्षणासाठी धोकादायक

Next
ला पाल्य शाळेत मागे पडत आहे का? जर हो असेल तर सर्वप्रथम त्याची झोप नीट होत आहे का हे तपासा. कारण संशोधकांच्या मते, रात्री मुलं जर घोरत असतील तर त्याचा त्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होते.

मुलांमध्ये अधूनमधून घोरण्यामुळे काही नुकसान नाही मात्र, सतत घोरण्यामुळे त्यांची झोप व्यस्थित होत नाही आणि त्यामुळे दिवसा त्यांचे कशातच लक्ष लागत नाही.

सातत्याने घोरण्यामुळे ‘स्लीप अप्नेआ’ नावाचा आजार होण्याची शक्यता असते. गंभीर स्वरुपाच्या या आजारामध्ये श्वसनक्रिया वेळोवेळी बंदी पडते आणि सुरू होते. मोठ्या आकाराच्या टॉनसिल्स किंवा अ‍ॅडेनॉईडमुळे घोरण्याची समस्या निर्माण होत असते. साध्या आॅपेरशद्वारे यावर इलाज शक्य आहे.

या संशोधनामध्ये घोरणारे आणि न घोरणारे असे पाच ते सात वयोगटातील एकूण 1359 विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला. स्लीप अ‍ॅप्नेआच्या तीव्रतेनुसार सर्व विद्यार्थ्यांना चार विविध गटांमध्ये विभागण्यात आले.

झोपेसंदर्भातील प्रश्नावली, एक संपूर्ण रात्र जागून अभ्यास आणि बौद्धिक कौशल्य तपासणी अशा विविध प्रकारे त्यांचा अभ्यास करण्यात आला. या विश्लेषणातून असे दिसून आले की, घोरण्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो.

Web Title: Dangerous to children's education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.