पाळीव प्राण्याचेही आहेत धोके
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2016 11:41 AM2016-05-04T11:41:33+5:302016-05-04T17:11:33+5:30
ज्यांच्याकडे मांजर आहे, त्या घरातील व्यक्तींना स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसआॅर्डर किंवा अचानक संताप येऊन फिट येण्याची अधिक शक्यता आहे.
Next
अभ्यासानुसार ज्यांच्याकडे मांजर आहे, त्या घरातील व्यक्तींना स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसआॅर्डर किंवा अचानक संताप येऊन फिट येण्याची अधिक शक्यता आहे. जॉन हापकीन युनिव्हर्सिटी स्कूल आॅफ मेडिसिनमध्ये हा संशोधनपर अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. मांजरीच्या विष्ठेत ‘टॉक्सोप्लास्मा गोंडी’ हा परजिवी जंतू आढळला आहे.
ब-याच कालावधीपासून तुम्ही मांजरीच्या संपर्कात असाल तर मोठे झाल्यानंतर आयुष्यात मोठ्या मानसिक आजाराला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. प्रौढ गटातील व्यक्तींच्या तपासणीनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. मांजरीचे वय जसजसे वाढत होते, तसतसे त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींमध्ये मानसिक आजार बळावत चालल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले. डॉक्टरांनी गर्भवतींसुद्धा धोक्याचा इशारा दिला आहे.