केवळ अपुरी झोप नाही तर 'ही' आहेत डोळ्याखाली काळे डाग येण्याची कारणे?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 11:17 AM2019-12-16T11:17:58+5:302019-12-16T11:24:24+5:30
Dark Circles Removal Tips : डार्क सर्कलचा विषय निघाला की, सहजपणे कुणीही झोप झाली नसेल किंवा पूर्ण झोप घेत जा असा सल्ला देतात.
डार्क सर्कलचा विषय निघाला की, सहजपणे कुणीही झोप झाली नसेल किंवा पूर्ण झोप घेत जा असा सल्ला देतात. म्हणजे काय तर डोळ्याखाली डार्क सर्कल येण्याचं मुख्य कारण हे पुरेशी झोप न घेणे हेच अनेकजण समजतात. अनेकदा डोळ्याखालच्या त्वचेचा रंग हा डार्क होतो. पण याला केवळ झोप न घेणे हेच कारण नाही. अनेक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही डार्क सर्कल्स येतात. चला जाणून घेऊ डार्क सर्कलची कारणे....
व्हिटॅमिन ए ची कमतरता
व्हिटॅमिन ए त्वचेसाठी अॅंटी-ऑक्सिडेंट्ससारखं काम करतं. त्यामुळे या व्हिटॅमिनचा नियमित आहारात समावेश करायला हवा. कारण व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डार्क सर्कलची समस्या होऊ शकते. व्हिटॅमिन ए मुळे त्वचेचं तारूण्य वाढतं आणि ब्लड सर्कुलेशनही योग्य प्रकारे होतं. तसेच याने शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढले जातात. त्यामुळे डाएटमध्ये गाजर, कलिंगड, पपई यांसारख्या फळांचा समावेश करावा.
व्हिटॅमिन सी ची कमतरता
अनेकदा या फायदेशीर व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी हेल्दी आणि त्वचेला निरोगी ठेवण्याचं महत्वाचं व्हिटॅमिन आहे. याच्या सेवनाने नसा मजबूत होतात. तसेच त्वचा लवचिक होतो आणि डोळ्यांखालील त्वचेवर आलेली सूजही दूर होते.
त्यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर करायची असेल तर वेगवेगळ्या फळांसोबतच हिरव्या पालेभाज्यांचंही सेवन करावं. त्यात संत्री, लिंबू, फ्लॉवर, ब्रोकली यांचा समावेश करावा. यातून तुम्हाला भरपूरप प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळेल.
काय आहे उपाय?
रोज कमीत कमी ८ तासांची झोप
दिवसा घराबाहेर पडताना सन ग्लासेस वापरणे
जर डोळ्यांच्या आजूबाजूला काळे डाग असतील तर कच्च्या बटाट्याची किंवा काकडीची पेस्ट लावा
चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवा
व्हिटॅमिन सी, के आणि व्हिटॅमिन इ असलेले क्रीम यासाठी वापरु शकता.
पोषक आहार
आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनात महिला आपल्या आरोग्याकडे आणि आहाराकडे फार लक्ष देत नाहीत. त्यामुळे तरुण असतानाच डोळ्यांच्या चारही बाजूने बारीक रेषा दिसू लागतात. हसताना किंवा जांभई देताना त्वचेवर ताण पडतो. क्रॅश डायटिंग याचं प्रमुख कारण आहे. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर याने त्वचा आकुंचन पावतात आणि सुरकुत्या वाढतात. त्यामुळे पोषक आहार घेणे यासाठी फार महत्वाचे आहे.
अशात दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. ताजी फळे, ज्यूस, ताक, लिंबू पाणी आणि लस्सीचे सेवन करावे. नेहमी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. क्रॅश डायटिंग टाळा कारण याने वजन कमी झाल्यावर त्वचा सैल पडते आणि सुरकुत्या दिसू लागतात.