​हृदयरोग्यांमध्ये डिप्रेशनच्या उपचाराचे प्रमाण कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2016 01:56 PM2016-04-20T13:56:58+5:302016-04-20T19:26:58+5:30

केवळ नैराश्य असलेले लोक हे हृदयरोगानंतर नैराश्य आलेल्या लोकांच्या तुलनेत अधिक उपचार घेतात.

Deficiency treatment reduces cardiovascular disease | ​हृदयरोग्यांमध्ये डिप्रेशनच्या उपचाराचे प्रमाण कमी

​हृदयरोग्यांमध्ये डिप्रेशनच्या उपचाराचे प्रमाण कमी

Next
ट्रेस, ताण-तणाव, नैराश्य हे रोजच्या वापरातील शब्द बनले आहेत. नैराश्य आणि हृदयविकाराचा फार जवळचा संबंध आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते मात्र, त्यावर उपचार करण्याचे प्रमाण कमी असते, असा अनोखा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.

केवळ नैराश्य असलेले लोक हे हृदयरोगानंतर नैराश्य आलेल्या लोकांच्या तुलनेत अधिक उपचार घेतात. हृदयविकार व नैराश्य असलेले केवळ 16 टक्के लोक अँटी-डिप्रेसंट घेतात. मात्र हेच प्रमाण के वळ नैराश्य असलेल्या लोकांमध्ये 42 टक्के आहे.

स्वीडनमधील कारोलिंस्का इन्स्टिट्यूटचे संशोधक बारब्रो केलस्ट्रॉम यांनी सांगितले की, फक्त नैराश्य असलेले लोक हे नैराश्य असलेल्या हृदयरोग्यांपेक्षा दुपटीने अधिक उपचार घेतात. थोडादेखील तणाव असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण दुप्पट असते. 

Web Title: Deficiency treatment reduces cardiovascular disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.