अंडरआर्म्सचे केस काढताना करु नका 'या' चुका, नाही तर पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 12:22 PM2019-04-05T12:22:20+5:302019-04-05T12:29:20+5:30

आपल्या सर्वांनाच खासकरून महिलांना हे चांगलंच माहीत आहे की, अंडरआर्म्सचे केस साफ करण्याची प्रक्रिया फारच वेदनादायी असते.

Do and Dont for underarm hair removal | अंडरआर्म्सचे केस काढताना करु नका 'या' चुका, नाही तर पडेल महागात!

अंडरआर्म्सचे केस काढताना करु नका 'या' चुका, नाही तर पडेल महागात!

googlenewsNext

(Image Credit : StackedSkincare)

आपल्या सर्वांनाच खासकरून महिलांना हे चांगलंच माहीत आहे की, अंडरआर्म्सचे केस साफ करण्याची प्रक्रिया फारच वेदनादायी असते. त्यामुळे हे करताना फार जास्त काळजी घेण्याची गरज असते. नाही तर थोड्याशा चुकीमुळे अंडरआर्म्समध्ये काळे डाग आणि असमान स्किन टोनचे तुम्ही शिकार होऊ शकता. म्हणजे तुम्हाला स्लीवलेस कपडे परिधान करणे अवघड जाईल. पण अंडरआर्म्स दूर करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. हे करताना तुम्हाला त्वचेच्या काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. 

चांगल्याप्रकारे स्वच्छ करुन सुकवा

अंडरआर्म्स स्वच्छ केल्याशिवाय केस दूर काढण्याची चूक करू नका. आधी अंडरआर्म्स चांगल्याप्रकारे स्वच्च करा आणि पाण्याने धुतल्यावर एक चांगलं स्क्रब लावून मालिश करा. याने केस मुलायम होऊन सहजपणे निघतील. तसेच घामामुळे झालेले डेड स्किप आणि जमा झालेली धूळ-मातीही दूर होईल. जर तुम्ही वॅक्सिंग स्ट्रीपचा वापर करत असाल तर स्क्रबनंतर चांगल्याप्रकारे सुकल्यावरच स्ट्रीप वापरा.

(Image Credit : Beautyheaven)

हातांच्या स्ट्रेचिंगवरही द्या लक्ष

केस काढताना हात चांगल्याप्रकारे स्ट्रेच करून वरच्या बाजूने उचला. अंडरआर्म्स सैल किंवा अर्धवट वर करू नका. याने त्वचा सैल झाल्याने शेविंग करताना कापलं जाण्याची भीती असते. इतकेच नाही तर केस चांगल्याप्रकारे शेव्ह होणार नाही आणि क्लीन लूक मिळणार नाही. 

(Image Credit : StyleCaster)

टाइट कपडे वापरू नका

अंडरआर्म्स केल्यावर टाइट स्लीव्स कपडे वापरणे टाळा. याने तुम्हाला अधिक घाम येईल आणि रॅशेज व जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. प्रयत्न करा की, २ ते ३ दिवस तुम्ही सैल कपडे वापरावेत आणि डिओड्रन्टचा देखील वापर करु नका. एका दिवसानंतर याचा वापर करा.

(Image Credit : MyFatPocket)

योग्य डायरेक्शनने काढा केस

जर तुम्ही अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी शेविंग करण्याचा विचार करत असाल तर नेहमी शेविंग योग्य डायरेक्शनमध्ये व्हावं याची काळजी घ्या. अंडरआर्म्सचे केस काढताना नेहमी रेजरची मुव्हमेंटची ग्रोथ विरूद्ध दिशेने असावी. असंच वॅक्सिंग स्ट्रीपबाबत सांगता येईल. म्हणजे तुमच्या केसांची ग्रोथ वरुन खालच्या दिशेने असेल तर रेजरचा वापर खालून वरच्या दिशेने करा. 

प्रत्येक स्ट्रोकला ब्लेड स्वच्छ करा

जर तुम्ही अंडरआर्म्सचे पूर्ण केस काढून झाल्यावर रेजर ब्लेड स्वच्छ करत असाल तर असं करु नका. प्रत्येक स्ट्रोकनंतर ब्लेड स्वच्छ करा. जर असं केलं नाही तर केस आणि डेड स्कीन ब्लेडमध्ये फसेल आणि शेविंग चांगल्याप्रकारे होणार नाही. त्यामुळे परफेक्ट शेवसाठी ब्लेड प्रत्येक स्ट्रोकनंतर धुवावं. सोबतच स्ट्रोक फार मोठे न घेता लहान घ्यावे.

(Image Credit : GirlandBoyThing.com)

छोटे छोटे पॅच घ्या

जर तुम्ही अंडरआर्म्स साफ करण्यासाठी वॅक्सचा वापर करत असाल तर छोट्या छोट्या पॅचने करा. त्यासोबतच जर शेविंगसाठी रेजरचा वापर करत असाल तर शॉर्ट स्ट्रोक घ्या. पुन्हा पुन्हा एकाच जागेवर रेजर किंवा वॅक्सचा वापर करु नका. याने बगलेत जळजळ किंवा लाल डाग पडतील. 

आफ्टर केअर

वॅक्स आणि शेविंग केलेल्या जागेवर आराम मिळवण्यासाठी लगेच अ‍ॅलोवेरा जेल आणि आइस क्यूब लावा किंवा मॉइश्चरायजरचा वापर करा. याने तुमच्या छोट्या छोट्या बारीक केसांमध्ये होणारी खाज दूर होईल आणि रॅशेजपासूनही बचाव होईल. 

Web Title: Do and Dont for underarm hair removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.