तरुण दिसण्यासाठी हे करा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2016 12:02 PM2016-09-21T12:02:34+5:302016-09-21T17:32:34+5:30
काळानुसार लोकांची जीवनशैलीही बदलत आहे.
Next
काय आहे कारण : कमी वयात वृद्ध होणे हे कु णालाही आवडत नाही. परंतु, पोषण तत्वाची कमतरता, तळलेले खाद्यपदार्थ , अधिक चहा किंवा कॉफी घेणे , धुम्रपान या सवयीमुळे या समस्या उद्भवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याकरिता नुकसानकार गोष्टी टाळणे गरजेचे आहे.
सफरचंद व दूध : सफरचंद बारीक करुन, त्यामध्ये कच्चे दुध टाकून तो पेस्ट चेहºयावर लावावा. पेस्ट वाळल्यानंतर चेहरा धुवून काढावा. आठवड्यातून कमीत कमी चार वेळा हे करणे आवश्यक आहे. त्यामुळे चेहºयावर नक्कीच फरक दिसून येतो.
टमाटे, दही व पीठ : बारीक केलेल्या दोन टमाट्यामध्ये तीन चमचे दही व दोन चमचे बार्लीचे पीठ मिक्स करावे. मिश्रण चेहºयावर लावून, कमीत कमी २० मिनीटापर्यंत ठेवावे. त्यामुळे चेहºयावर झुरळ्या कमी व्हायला लागतात. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा हा उपाय महिनाभर करावा.