ग्लोइंग स्किनसाठी प्रयत्न करत असाल तर 'या' गोष्टी विसरू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 12:48 PM2019-01-31T12:48:02+5:302019-01-31T12:48:29+5:30
आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी आपण अनेक उपायही करत असतो. बाजारात दरदिवशी नवनवीन प्रोडक्ट्स लॉन्च होतच असतात. हे प्रोडक्ट्स वापरल्याने तुम्हाला तजेलदार आणि चमकदार त्वचा मिळण्यास मदत होइल असेही दावे त्यांच्याकडून करण्यात येतात.
आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी आपण अनेक उपायही करत असतो. बाजारात दरदिवशी नवनवीन प्रोडक्ट्स लॉन्च होतच असतात. हे प्रोडक्ट्स वापरल्याने तुम्हाला तजेलदार आणि चमकदार त्वचा मिळण्यास मदत होइल असेही दावे त्यांच्याकडून करण्यात येतात. पण प्रत्येक वेळी बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाच वापर करण्याची गरज असतेच असे नाही. एवढचं नव्हे तर कोणतेही पदार्थ त्वचेवर न लावताही तुम्ही त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य वाढवू शकता. फार काही अवघड काम करण्याचीही गरज नाही. तुम्हाला फक्त काही सवयींचा तुमच्या रोजच्या दिनक्रमामध्ये समावेश करायचा आहे.
आपलं शरीर निरोगी आणि आकर्षक ठेवण्यासाठी फक्त बाहेरील मेकअप गरजेच नसतं. तर त्यासाठी शरीराला पोषक घटकांचीही गरज असते. अनेकदा आपण उत्तम आणि पौष्टिक खाद्यपदार्थांचा आहारामध्ये समावेश केला तरी त्याचा शरीराला आणि त्वचेला काही फायदाच होत नाही. कारण आपण डाएट फॉलो करतो पण त्यासाठी आवश्यक असणारे काही नियम आपण फॉलो करत नाही. त्यामुळे त्या डाएटचा पूर्ण फायदा आपल्या शरीराला होत नाही. तुम्हीही जर हेल्दी राहण्यासोबतच त्वचाही तजेलदार करण्यासाठी सतत प्रयत्न करत असाल तर काही गोष्टी लक्षात घ्या...
खूप पाणी पिणं ठरतं फायदेशीर...
जर तुम्ही शरीरामधील नको असलेले घटक बाहेर काढून टाकण्यासाठी औषधं घेण्यचा विचार करत असाल तर त्याऐवजी तुमच्या रूटीनमध्ये पाण्याचा जास्त समावेश करा. दररोज 3 ते 4 लीटर पाणी पिणं गरजेचं असतं. त्यामुळे शरीरातील नको असलेले घटक बाहेर काढून टाकण्यास मदत होईल. पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आणि हानिकारक बॅक्टेरिया यूरिन आणि विष्ठेवाटे बाहेर टाकण्यात येतात.
बडिशेप
बडिशेपमध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. दररोज बडिशेप खाल्याने शरीरातील रक्त डिटॉक्सिफाय होतं आणि सर्व विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.
ग्रीन टी
ग्रीन टी प्यायल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसच यातील गुणधर्म मेटाबॉलिज्म ठिक ठेवतं आणि रक्तामध्ये असलेले अशुद्ध घटक बाहेर टाकण्यासाठी उपयोगी ठरतात.
सलाड
सलाडमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट आणि एंजाइम्सचे प्रमाण अधिक असते. शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी सलाड फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर शरीरातील पाचनक्रिया ठिक करण्यासाठीही मदत करतं. याव्यतिरिक्त सलाडचा आहारात समावेश केल्याने शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स शरीराला मिळतात.
फाइबर युक्त आहार
रक्त शुद्ध करण्यासाठी फायहर आणि व्हिटॅमिन सीचा आहारात समावेश करणं आवश्यक असतं. हिरव्या पालेभाज्या, फळं, ड्राय फ्रूट्स, ज्वारी, बाजरी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. व्हिटॅमिन सी साठी लिंबू, संत्री, आवळा आणि पपई फायदेशीर ठरते. तर बीटाचा आहारात समावेश केल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
व्यायाम करा
नियमितपणे व्यायाम केल्याने शरीराला घाम येतो. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत होते. तसेच व्यायामामुळे स्नायूंची हालचाल होऊन वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत होते.