डॉक्टरांकडे न जात ब्लड प्रेशर ठेवा नियंत्रणात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2016 04:31 PM2016-09-30T16:31:28+5:302016-09-30T22:01:28+5:30
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याची ही खास माहिती
Next
१ दररोज सात तास झोपावे : जे पाच तास किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळ झोप घेतात, त्यांना हाय ब्लेड प्रेशरची समस्या उद्भवते हे संशोधनातून समोर आले आहे. त्याकरिता दररोज सात झोप घ्यावी असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
२ कमी मीठ खावे : मीठ हे शरीरात अधिक पाणी वाढविण्याचे काम करते. शरीरात अधिक प्रमाणात पाणी वाढले तर ब्लेड प्रेशर वाढण्याचा मोठा धोका आहे.
३ आठवड्यातून १५० मिनिटे एक्सरसाईज : ब्लड प्रेशरला दूर ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी १५० मिनिटे एक्सरसाईज करावी. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
४ दररोज दहा मिनिटे मेडिटेशन : तणावामुळे मानवाच्या शरीरातून एड्रेलिन नावाचा एक हार्मोन निघतो. तो हृदयाचे ठोके व ब्लड प्रेशर वाढविण्याचे काम करतो. त्याकरिता तणावातून सुटण्यासाठी मेडिटेशन हे खूप महत्वाचे आहे. दिवसभरात दहा मिनिटेही मेडिटेशन केले तर ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येते.
५ भाज्या व फळाचे सेवन : आपल्या जेवणामध्ये भाज्या व फळाचे सेवन अधिक असेल तर ब्लड प्रेशरच्या समस्यापासून दूर राहता येते. हापरटेंशनच्या रूग्णांसाठी फळे खाणे हे खूप उपयुक्त आहे.
६ वजन : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचे असेल तर याकरिता वजनही अगोदर नियंत्रणातच असावयाला हवे. आपल्या उंचीनुसार वजन असणे आवश्यक आहे.