शरीरावरील 'या' भागांवरील केस उपटण्याची करू नका चूक, पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 02:50 PM2019-06-08T14:50:52+5:302019-06-08T14:56:24+5:30
शरीरावर महिला आणि पुरूषांना वेगवेगळ्या ठिकाणी केस असतात. पण हार्मोन्सच्या वेगळेपणामुळे महिलांना मिशी किंवा दाढी येत नाही.
(Image Credit : Medical News Today)
शरीरावर महिला आणि पुरूषांना वेगवेगळ्या ठिकाणी केस असतात. पण हार्मोन्सच्या वेगळेपणामुळे महिलांना मिशी किंवा दाढी येत नाही. पण तरी सुद्धा काही शरीराच्या काही भागांवर अनावश्यक केस येतात. याने होतं असं की, सौंदर्याचे तीनतेरा वाजतात. अशात हे केस उपटून काढण्याचा प्रयत्न काही लोक करतात. पण अशाप्रकारे केस उपटून काढणे तुम्हाला महागात पडू शकतं. कसं ते खालीलप्रमाणे TheHealthSite ने दिलेल्या वृत्तानुसार सांगता येईल.
१) चामखिळी :
अनेकदा शरीरावरील चामखिळीवरही एक किंवा दोन केस येतात. पण त्यावरील केस खेचून काढू नये. असं कराल तर तीव्र वेदना होतात सोबतच इन्फेक्शनचाही धोका असतो. तुम्हाला चामखिळीवरील केस काढायचा असेलच तर ट्रीम करा किंवा लेझर हेअर रिड क्शनच्या मदतीने योग्य आणि सुरक्षित पद्धतीने काढा.
२) स्तनाजवळ :
(Image Credit : www.self.com)
स्तनांजवळ विरळ स्वरूपात केस असणं सामान्य बाब आहे. ते उपटण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात. तर ट्विझरने केस उपटल्याने इन्फेक्शन होऊ शकते. विनाकारण २ मिलीमीटरपेक्षा लहान केस उपटू नका. अगदीच गरज असेल तर स्तनाजवळील केसांना उपटण्याऐवजी ट्रीम करा.
३) आयब्रो :
कपाळावरील आयब्रो हा देखील एक नाजूक भाग आहे. सतत त्या जागेवरील केस उपटल्याने हेअर फॉलिकल्सला त्रास होऊ शकतो. ब्युटी पार्लरमध्ये तज्ञांद्वारा भुवयांना शेप देणं सुरक्षित आहे. परंतू स्वतःहून भुवयांजवळील केस उपटू नका.
४) इन्ग्रोव्हन हेअर :
वॅक्सिंग किंवा रेझरमुळे शरीरावर इन्ग्रोव्हन केस वाढतात. असे केस ट्विझिंगने काढणं त्रासदायक ठरतं. यामुळे स्कार - डाग किंवा इंफेक्शनचा त्रास वाढतो. पण तुम्हांला इन्ग्रोव्हन केसांचा त्रास कमी करायचा असेल तर डरमेटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि त्यानुसार पुढील उपचार पद्धती निवडा.