चेहरा स्वच्छ करण्यासाठी साबण वापरता? साबण विसरा एकदा हे क्लिंजर वापरुन बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:59 PM2018-11-15T13:59:24+5:302018-11-15T14:00:42+5:30
चेहऱ्याचं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी त्वचेची योग्यप्रकारे स्वच्छता करणे गरजेचं असतं. मेकअप रोज क्लिंजिंग मिल्कने काढणं शक्य नसतं.
(Image Credit : Beauty Zone)
चेहऱ्याचं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी त्वचेची योग्यप्रकारे स्वच्छता करणे गरजेचं असतं. मेकअप रोज क्लिंजिंग मिल्कने काढणं शक्य नसतं. त्यामुळे त्वचेची रोमछिद्रे घाण साचल्याने बंद होतात आणि त्वचा खराब होऊ लागते. अशावेळी उपाय म्हणून आम्ही तुम्हाला काही घरी तयार करता येणारे क्लिंजर्स सांगणार आहोत. या क्लिंजर्सचा वापर करुन त्वचा केवळ स्वच्छ नाही तर सुंदर दिसण्यासही मदत होईल.
काबूली चणे आणि हळद
अर्धा कप काबुली चण्याचं पावडर घ्या. यात एक चमचा हळद पावडर आणि अर्धा कप दूध मिश्रित करा. हे मिश्रण चेहरा, हात आणि मानेवर लावा. २ मिनिटांनी हा पॅक पाण्याच्या काढून टाका. हा क्लिंजर त्वचा तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचा असलेल्यांसाठी फायदेशीर आहे.
दही आणि काकडी
एका काकडीला बारीक करुन त्याचा रस काढा. यात ३ ते ४ चमचे दही मिश्रित करा. हे मिश्रण चेहरा, कपाळ आणि मानेवर लावा. याने चेहऱ्याची स्वच्छता होण्यासोबतच त्वचेवरील डाग आणि सुरकुत्याही दूर होतील.
बदाम आणि अंड
५ ते ६ बदामाचं पावडर तयार करा. यात अंड्याचा पांढरा भाग आणि एक चमचा मध टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहरा, कपाळ आणि मानेवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. जेव्हा हा पॅक सुकेल तेव्हा चेहरा पाण्याने धुवा. हा कोरड्या त्वचेसाठी चांगला क्लिंजर आहे.
दही आणि मध
अर्धा कप दह्यामध्ये अर्धा कप मध लावा. चेहरा, कपाळ आणि मानेवर हे मिक्षण लावून हलक्या हाताने मसाज करा. २ ते ३ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.
कोकोनट क्लिंजर
एक कप पत्तागोबीच्या रसात तितकच नारळाचं दूध आणि अर्धा चमचा बदामाचं तेल मिश्रित करा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावून मसाज करा. काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवा.
ग्रेप क्लिंजर
त्वचा तेलकट असेल तर द्राक्ष चांगल्याप्रकारे बारीक करा किंवा मिक्सरमधून बारीक करा. यात लिंबाचा रस आणि अंड्याचा पांढरा भाग टाकून मिश्रण तयार करा. हे क्लिंजर २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.