... म्हणून 'या' 5 पदार्थांचा त्वचेसाठी वापर करणं ठरू शकतं घातक!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 03:08 PM2019-04-29T15:08:42+5:302019-04-29T15:09:31+5:30
आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी प्रत्येकजण सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या विविध प्रोडक्ट्सचा आधार घेण्यात येतो.
आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी प्रत्येकजण सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या विविध प्रोडक्ट्सचा आधार घेण्यात येतो. तुम्हीही विविध कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स, लोशन्स, क्रिम्सचा वापर करत असाल परंतु, हे प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी अनेक केमिकल्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अनेकदा इन्फेक्शन किंवा रॅशेजचा धोका असतो. त्यामुळे या प्रोडक्ट्सपासून लांब राहणं अत्यंत फायदेशीर ठरतं. ज्यांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते त्यांनी तर त्वचेची अत्यंत काळजी घेणं आवश्यक असतं. जाणून घेऊया चेहऱ्यावर कोणत्या पदार्थांचा वापर करावा त्याबाबत... ज्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच चेहऱ्याचं तारूण्यही टिकवण्यासाठी मदत होते.
बॉडी लोशन
तुमच्या शरीराच्या त्वचेच्या तुलनेमध्ये चेहऱ्याची त्वचा सेन्सेटिव्ह असते. त्यामुळे तुम्ही बॉडि लोशन चेहऱ्यावर लावू नका. चेहऱ्यावर बॉडि लोशन लावल्याने त्वचेवर पिंपल्सची समस्या होते.
(Image Credit : Tips and Tricks)
गरम पाणी
चेहरा धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचाच वापर करा. गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा कोरडी होते. ज्यामुळ चेहऱ्याचं सौंदर्य बिघडतं आणि चेहऱ्यावर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात.
लिंबू
लिंबाचा वापर करणं चेहऱ्याच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. परंतु, लिंबाचा रस जर तुम्ही दूध, दही, हळद आणि बेसनासोबत एकत्र करून लावा. फक्त लिंबाचा रस थेट त्वचेवर लावू नका. लिंबाच्या रसाचं पीएच लेव्हल जास्त असतं. ज्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला नुकसान पोहोचतं.
व्हिनेगर
व्हिनेगरचा वापर तुम्ही केसांवर कंडिशनर म्हणून करू शकता. परंतु याचा चुकूनही चेहऱ्यावर वापर करू नका. खासकरून तेव्हा जेव्हा व्हिनेगर फार जुनं असेल. व्हिनेगरमध्ये अॅसिडीक गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेला नुकसान पोहचू शकतं.
रबिंग अल्कोहोल
छोट्या जखमेवर याचा वापर करणं ठिक आहे. परंतु, याचा वापर चेहऱ्यावर चुकूनही करू नका. याचा वापर चेहऱ्यावर केल्याने नुकसान होऊ शकतं.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.