तुम्हीही नवीन कपडे न धुताच वापरता का? होऊ शकतात या समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 01:31 PM2018-10-17T13:31:50+5:302018-10-17T13:33:23+5:30
अनेकजण नवीन कपडे घेतले की ते न धुताच वापरायला लागतात. पण असे करणे तुम्हाला महागात पडू शकतं. याने तुम्हाला अनेकप्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
(Image Credit : www.independent.co.uk)
अनेकजण नवीन कपडे घेतले की ते न धुताच वापरायला लागतात. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. याने तुम्हाला अनेकप्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याने तुमच्या स्किनला इन्फेक्शन होऊ शकतं. अनेकदा नवीन कपड्यांमध्ये ते तयार करतेवेळी वापरण्यात येणारे केमिकल्स तसेच राहतात. अशात या केमिकल्समुळे तुमच्या त्वचेला इन्फेक्शनची समस्या होऊ शकते. याने अॅलर्जीची समस्या वाढते.
कसे पोहोचतात तुमच्यापर्यंत नवे कपडे?
हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की, तुमच्याआधी हे कपडे अनेकांनी ट्राय केलेले असतात. ज्या दुकानातून किंवा मॉलमधून तुम्ही कपडे घेता ते तिथे येण्याआधीही अनेक ठिकाणांहून आलेले असतात. कपड्यांवर केमिकल्स किंवा रंगांचा वापर केल्यावर त्यांना धुतलं जात नाही. अशात केमिकल्सचे काही अंश कपड्यांमध्ये शिल्लक राहतात.
काय होतात परिणाम?
जेव्हा तुम्ही नवीन कपडे न धुताच वापरता तेव्हा स्किन इन्फेक्शन सोबतच इतरही काही आजारांचा धोका असतो. त्यामुळे हे आवश्यक आहे की, नवीन कपडे खरेदी केल्यावर एकदा ते पाण्यातून काढा आणि नंतर वापरा.
१) जेव्हा लोक बाहेरच्या गरमीतून मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांच्या शरीराला घाम, धुळ-माती लागलेली असते. लोक अशा स्थितीतच वेगवेगळे कपडे ट्राय करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावरील घाम, धुळ आणि त्यांना असलेल्या जखमेतील किटाणू त्या कपड्यांना लागतात. तुम्ही तेच कपडे घेतलेत तर त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो. ज्या लोकांची स्कित अधिक संवेदनशील असते त्यांनी ही समस्या लगेच होऊ शकते. लहान मुलांनाही नवीन कपडे धुतल्याशिवाय वापरू देऊ नका कारण त्यांची स्किन अधिक संवेदनशील असते.
२) कपड्यांना रंग देताना नैसर्गिक रंगांचा वापर होऊ शकत नाही. अशात कपड्यांना रंगवण्यासाठी छपाई आणि डायसारख्या प्रक्रियांचा वापर केला जातो. तसेच कपड्यांमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स लावले जातात. या केमिकल्सचा काही अंश कपड्यांना चिकटून राहतो. जेव्हा तुम्ही हे कपडे वापरता तेव्हा केमिकल्स स्किनच्या संपर्कात येतात आणि यामुळे स्किनला अॅलर्जीचं हे एक कारण ठरु शकतं.