पिंपल्सला असे करा दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 05:00 PM2016-10-28T17:00:01+5:302016-10-28T17:00:01+5:30

चेहरा गोरा आणि सुंदर आहे, मात्र या सुंदर चेहऱ्यावर पिंपल्स आहेत. या पिंपल्सकडे जास्त दुर्लक्ष झाले तर ही समस्या वाढतच जाते. आपला सुंदर चेहरा जास्तच खराब होतो. आपले सौंदर्य कमी करणारे पिंपल्स कसे कमी करायचे याबाबत काही टिप्स...

Do this to the pumpples so far | पिंपल्सला असे करा दूर

पिंपल्सला असे करा दूर

Next
हरा गोरा आणि सुंदर आहे, मात्र या सुंदर चेहऱ्यावर पिंपल्स आहेत. या पिंपल्सकडे जास्त दुर्लक्ष झाले तर ही समस्या वाढतच जाते. आपला सुंदर चेहरा जास्तच खराब होतो. आपले सौंदर्य कमी करणारे हे पिंपल्स कसे कमी करायचे याबाबत काही टिप्स...

* लिंबात आम्ल आणि गुलाब पाण्यात थंडावा असल्याने दोघांचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास पिंपल कमी होण्यास खूप मदत होते. यासाठी तुम्ही जेवढा लिंबाचा रस घ्याल त्याच्या दुप्पट गुलाब पाणी घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यानंतर १५ मिनिट राहू द्या आणि त्यानंतर धुवा. 

* संत्र्याच्या सालींमुळेही पिंपल्स दूर करण्यास मदत होते. या सालींमध्ये गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा व या पेस्टला जिथे पिंपल्स आहेत त्या जागी लावा आणि थोड्या वेळानी कोमट पाण्याने धुवा.

* चंदन पावडर आणि गुलाब पाणी मिसळून घ्या. यामुळे चेहरा उजळतोही आणि पिंपल्सची समस्याही दूर होते. चंदन पावडरमध्ये अँटी-बॅक्टेरियाचेही गुण असतात.

* मुलतानी मातीचा वापर गुलाब पाण्यासोबत त्वचा उजळ करण्यासाठी केला जातो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

* अद्रकासोबत गुलाब पाणी लावणेही खूप फायदेशीर आहे. अद्रकामध्ये अँटी बॅक्टेरिअल गुण असतात. यामुळे भविष्यात होणाºया त्वचेच्या समस्यांना रोखण्यासाठी फायदेशीर आहे.

Web Title: Do this to the pumpples so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.