आता अॅसिड हल्ल्याने नाही होणार चेहऱ्याचं नुकसान; डॉक्टरांनी शोधला खास उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 04:37 PM2018-10-30T16:37:57+5:302018-10-30T16:41:52+5:30

ब्रिटनच्या यॉर्कशायरमधील डॉक्टरांनी एक संशोधन केले असून त्याबाबत संपूर्ण जगभरात त्यांच्या या संशोधनाची चर्चा होत आहे. या डॉक्टरांनी एक असं केमिकल शोधून काढला आहे जो महिलांचा अॅसिड अटॅकपासून बचाव करेल.

doctor developed chemical that protects from acid attack | आता अॅसिड हल्ल्याने नाही होणार चेहऱ्याचं नुकसान; डॉक्टरांनी शोधला खास उपाय !

आता अॅसिड हल्ल्याने नाही होणार चेहऱ्याचं नुकसान; डॉक्टरांनी शोधला खास उपाय !

Next

ब्रिटनच्या यॉर्कशायरमधील डॉक्टरांनी एक संशोधन केले असून त्याबाबत संपूर्ण जगभरात त्यांच्या या संशोधनाची चर्चा होत आहे. या डॉक्टरांनी एक असं केमिकल शोधून काढला आहे जो महिलांचा अॅसिड अटॅकपासून बचाव करेल. 32 वर्षीय डॉ. अलमस अहमद या मागील 10 वर्षांपासून अशा केमिकल्सवर काम करत आहेत. जे अॅसिडच्या दुष्परिणामांपासून चेहऱ्याचा बचाव करू शकतील. त्यांनी 'अकेरियर' केमिकल तयार केलं आहे. हे मेकअपमध्ये मिसळून चेहऱ्यावर अगदी सहज लावणं शक्य होतं. हे अॅसिडमुळे चेहऱ्याच्या होणाऱ्या नुकसानापासून चेहऱ्याचं रक्षण करतं. 

अशी आली अॅसिड प्रुफ मेकअपची कल्पना 

डॉ. अलमस यांना हे केमिकल तयार करण्याची कल्पना तेव्हा आली जेव्हा 2008मध्ये एका डान्सिंग शोमध्ये सहभागी झालेल्या केसी पाइपरला अॅसिड अटॅकनंतर शोमधून काढून टाकलं. डॉ. अलमसनुसार, हे खास केमिकल फाऊडेशन क्रिममध्ये मिक्स करून लावलं जाऊ शकतं. लवकरचं हे केमिकल वापरून मॉयश्चरायझर आणि सनस्क्रिनसुद्धा तयार करण्यात येणार आहेत. 

संशोधनावर खर्च झाले 56 लाख रूपये

डॉ. अलमस यांनी सांगितल्यानुसार, हे केमिकल लिक्विड प्रूफ आहे आणि 400 डिग्री सेंटीग्रेटवरही टिकू शकेल. फार काळ उन्हामध्ये राहिल्यानंतरही किंवा स्विमिंग दरम्यानही याचा प्रभाव कमी होत नाही. मागील एक दशकापासून यावर काम करणाऱ्या यॉर्कशायरमध्ये राहणाऱ्या डॉ. अलमस यांनी सांगितले की, या शोधावर आतापर्यंत 56 लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. भारतामध्येही याची तपासणी सध्या सुरू असून लवकरच हे केमिकल जगभरातील महिलांना वापरासाठी उपलब्ध होणार आहे. 

प्रोफेशनसोबत सुरू ठेवला रिसर्च 

डॉ. अलमस यांच्यानुसार, जेव्हा केटीसोबत ही घटना घडली तेव्हा ती यूनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत होती. अॅसिड अटॅकची प्रकरणं इतर देशांच्या तुलनेमध्ये आशियाई देशामध्ये अधिक आहेत. त्यांची अशी आशा आहे की, हे केमिकल अॅसिड अटॅक महिलांसाठी फायदेशीर ठरेल. डॉ. अलमास यांनी मेडिकल स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर न्यूरोसर्जरीमध्ये रिसर्च फिजिशियन म्हणून काम केलं आहे. सध्या त्या एका मेडिकल कंपनीमध्ये चीफ इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून काम करत आहेत. त्यांनी आपल्या करिअरदरम्यान या केमिकलवर संशोधन करणं सुरू ठेवलं होतं. 

Web Title: doctor developed chemical that protects from acid attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.