हेल्मेट आणि टोपी वापरल्यामुळे टक्कल पडतं का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 05:09 PM2018-09-20T17:09:39+5:302018-09-20T17:10:45+5:30

सध्या हेल्मेटसक्ती केल्यामुळे बाइक चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक झालं आहे. पण अनेकजण हेल्मेट घालणं टाळतात. सतत हेल्मेट घातल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं असं त्यांचं म्हणण आहे. अशीच काहीशी कारणं टोपीच्या बाबतीतही ऐकायला मिळतात.

does helmet and hat increase the risk of becoming bald | हेल्मेट आणि टोपी वापरल्यामुळे टक्कल पडतं का? जाणून घ्या!

हेल्मेट आणि टोपी वापरल्यामुळे टक्कल पडतं का? जाणून घ्या!

googlenewsNext

सध्या हेल्मेटसक्ती केल्यामुळे बाइक चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक झालं आहे. पण अनेकजण हेल्मेट घालणं टाळतात. सतत हेल्मेट घातल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं असं त्यांचं म्हणण आहे. अशीच काहीशी कारणं टोपीच्या बाबतीतही ऐकायला मिळतात. पण ही कारणं खरी आहेत का? असं का होतं? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतात. पण हे खरं आहे. सतत हेल्मेट किंवा टोपी वापरल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं. कारण हेल्मेट घातल्याने तुमचे केस डोक्याच्या त्वचेच्या फार जवळ येतात. त्यामुळे केस कमजोर बनतात. त्याचबरोबर नवीन केस उगवण्याच्या प्रक्रियेवरही वाईट परिणाम होतो. याला वैद्यकिय भाषेमध्ये ट्रॅक्शन एलोपेसिया असं म्हटलं जातं. 

ट्रॅक्शन एलोपेसिया त्या लोकांमध्ये दिसून येतो जी लोकं आपले केस फार टाइट बांधून ठेवतात. त्याचबरोबर खूप वेळ हेल्मेट घालून ठेवणाऱ्या लोकांमध्येही केस गळण्याचे प्रमाण वाढते. 

अशी घ्या काळजी -

-  तुमचे केस जास्त घट्ट बांधू नका. 

- केस जास्त खेचू नका, केस मुळांशी जास्त खेचले गेल्यामुळे तुटतात. 

- तुमच्या केसांमध्ये आणि हेल्मेटमध्ये थोडं अंतर ठेवा जेणेकरून हवा आतमध्ये येऊ शकेल. 

- तुमच्या आहारातही समतोल असणं गरजेचं आहे. केसांसाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. 

बॅक्टेरियामुळेही गळतात केस

सतत हेल्मेट किंवा टोपी वापरल्यामुळे डोक्याच्या त्वचेला घाम येतो. डोक्याच्या त्वचेला येणारा घाम शरीरासाठी घातक असतो. यामुळे हेल्मेटच्या आतमध्ये बॅक्टेरिया तयार होतात. हे बॅक्टेरिया केसांवर चिकटतात आणि केस कमजोर होतात. हे नवीन केसांच्या ग्रोथवरही परिणाम करतात. हेल्मेट घालताना हेल्मेट आणि केसांमध्ये थोडं अंतर ठेवल्यामुळे हेल्मेटमध्ये हवा खेळती राहते आणि बॅक्टेरिया वाढतं नाहीत. 

Web Title: does helmet and hat increase the risk of becoming bald

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.