एक्सरसाइज केल्यानेही जास्त केसगळती होते का? जाणून घ्या सत्य.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 12:54 PM2019-12-24T12:54:46+5:302019-12-24T12:58:24+5:30

अनेकजण केसगळतीच्या समस्येने हैराण झाले आहेत. कमी वयातच अनेकांना केसगळती आणि टक्कल पडत असल्याने चिंतेने घेरलं आहे.

Does too much exercise cause hair fall? What is the truth | एक्सरसाइज केल्यानेही जास्त केसगळती होते का? जाणून घ्या सत्य.....

एक्सरसाइज केल्यानेही जास्त केसगळती होते का? जाणून घ्या सत्य.....

Next

अनेकजण केसगळतीच्या समस्येने हैराण झाले आहेत. कमी वयातच अनेकांना केसगळती आणि टक्कल पडत असल्याने चिंतेने घेरलं आहे. केसगळतीची वेगवेगळे कारणे नियमित समोर येत असतात. त्यात अनेकांना असाही प्रश्न पडतोय की, जास्त एक्सरसाइज केल्यानेही केसगळती होते का? चला तर जाणून घेऊ याचं उत्तर....

३.५ कोटी पुरूषांना ही समस्या

(Image Credit : bebeautiful.in)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात जवळपास ३.५ कोटी पुरूष केसगळतीच्या समस्येने हैराण आहेत. फिटनेस इंडस्ट्रीमध्येही अनेकांना डोक्यावर केस कमी आहेत किंवा टक्कल आहेत. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया की, एक्सरसाइज केल्यानेही केसगळतीची समस्या होते का?

काय आहे सत्य?

(Image Credit : verywellfit.com)

एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, एक्सरसाइज करताना केसगळतीची समस्या होणे सामान्य बाब आहे. मुळात केसगळतीचं किंवा टक्कल पडण्याचं मुख्य कारण डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचं असंतुलित झालेलं प्रमाण आहे. याचं प्रमाण टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त झल्यावर वाढतं. दुसरीकडे हेही खरं आहे की,  बॉडी बिल्डर किंवा एथलिट टेस्टोस्टेरॉन बूस्टर किंवा सप्लिमेंट्सचा वापर करून टेस्टोस्टेरॉन हाय करण्याचा प्रयत्न करतात. टेस्टोस्टेरॉन वाढलं तर डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं आणि केसगळती होऊ लागते.

लो कार्बोहायड्रेट हेही आहे कारण

रिसर्चनुसार, केसगळतीला लो कार्ब डाएट घेणंही कारणीभूत असतं. वजन कमी करण्यासाठी लोक कार्बोहायड्रेट आहारातून कमी घेतात. एका रिसर्चमध्ये ४५ लोकांना लो-कार्ब डाएट देण्यात आली. यातील २ लोकांमध्ये केस पातळ होणे आणि केसगळतीची समस्या बघण्यात आली.

काय कराल उपाय?

जर एखाद्या व्यक्तीचे केस बूस्टर किंवा स्टेरॉइड घेतल्याने पातळ होतात किंवा गळत असतील तर त्यांनी याचं सेवन बंद केलं पाहिजे. तसेच वेळीच एक्सपर्टचा सल्ला घ्यावा. तसेच आहार आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तुम्ही केसगळतीची समस्या दूर करू शकता.


Web Title: Does too much exercise cause hair fall? What is the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.