​उतार वयातील व्यायामामुळे वाढते आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2016 01:27 PM2016-05-05T13:27:27+5:302016-05-05T18:57:27+5:30

प्रौढ व्यक्तींनी ‘वेट लिफ्टिंग’ केली असता त्यांचे जीवनमान वाढते.

Downward exercise increases your life | ​उतार वयातील व्यायामामुळे वाढते आयुष्य

​उतार वयातील व्यायामामुळे वाढते आयुष्य

Next
यायामाचे सांगावे तितके फायदे कमीच आहेत. परंतु आता आणखी सर्वांना आनंद देणारा लाभ समोर आला आहे. पेन स्टेटच्या एका स्टडीमध्ये असे दिसून आले की, प्रौढ व्यक्तींनी ‘वेट लिफ्टिंग’ केली असता त्यांचे जीवनमान वाढते.

सायन्स डेलीने दिलेल्या माहितीनुसार, एकूण सर्वेक्षण केलेल्या लोकांपैकी 65 वर्षांपूढील जे लोक आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा कसरत करतात त्यांच्यापैकी 46 टक्के लोकांचा हे संशोधन पूर्ण होण्याआधी मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे, असा दावा करण्यात आला होता.

शक्तीशाली मसल्स आणि सदृढ हाडांमुळे उतारवयातही आपल्या शरीराला चांगला आधार मिळतो. यापूर्वी झालेल्या अनेक लहान-लहान संशोधनातून उपरोक्त निष्कर्ष काढण्यात आले होते.

मात्र, प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात याबाबत संशोधन करण्यात आले आहे. संपूर्ण देशातील 30 हजारांपेक्षा जास्त लोकांच्या वेट ट्रेनिंग आणि मृत्यूदर यांचा 15 वर्षे अभ्यास करणात आला.

विशेष म्हणजे, बाह्यघटक जसे मधुमेह आणि बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) यांचा विचार केला असता देखील सांख्यिकीयदृष्ट्या वरील निष्कर्ष सिद्ध होतात. म्हणजे घरात कोणी आजोबा असतील तर त्यांना म्हणावे वय झाले म्हणून काय झाले, व्यायाम करा.

Web Title: Downward exercise increases your life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.